नवी दिल्‍ली : तुम्ही जर कंबरदुखीच्या त्रासाने वैतागलेले आहात आणि तुम्ही यापासून सुटका मिळवण्याच्या शोधात असाल तर ही बातमी तुम्हाला दिलासा देणारी ठरू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैज्ञानिकांनी एका अशा स्मार्ट, यांत्रिक अंडरगारमेंटचा शोध लावलाय, ज्याद्वारे कंबरदुखीचा त्रास कमी होऊ शकतो. या स्मार्ट-यांत्रिक अंडरवेअरमुळे कमरेच्या खालच्या भागातील मांसपेशींमधील तणाव आणि दुखणं कमी होऊ शकतं. अमेरिकेत वॅंडरबिल्ट यूनिव्हर्सिटीच्या इंजिनिअरांनी बायोमेकॅनिक्स आणि विअरएअल तंत्राने ही अंडरगारमेट तयार केलीये. 


नायलॉन कॅनव्हास, पॉलिस्टरपासून निर्मिती :


विअरएबल तंत्र हे स्मार्ट इलेक्ट्रॉनिक यंत्र असतं जे शरिरावर परिधान केलं जाऊ शकतं. यात कपड्यांचे दोन भाग असतात. ज्यांचा वापर छाती आणि पायांसाठी केला जातो. हे कपडे नायलॉन कॅनवास, लाइक, पॉलिस्टर आणि इतर अन्य प्रकारच्या कपड्यांपासून तयार केलेले असतात. 


गरजेनुसार करणार काम :


हे दोन्ही भाग कंबरेच्या मधे मजबूत पट्ट्य़ांशी जोडलेले असतात आणि कंबरेच्या खालच्या भागावर प्राकॄतिक रबराचे तुकडे लावलेले असतात. हे यंत्र अशाप्रकारे बनवण्यात आले की, व्यक्तीला जेव्हा गरज पडेल तेव्हाच तो ते वापरू शकतो आणि इतरवेळी ते ही अंडरवेअर तशीच परिधान करू शकतात.  


ब्‍लूटूथ ने होणार कंट्रोल :


या स्मार्ट अंडरविअरची खासियत म्हणजे ही अंडरविअर Bluetooth ने कंट्रोल केली जाऊ शकते. या तंत्राचा उद्देश ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे. त्यांच्यावर उपचार करणे नाहीतर त्यांच्या कंबरेखालच्या मांसपेशींमध्ये तणाव आणि फॅट कमी करून दुखणं कमी करणे हा आहे.