मुंबई : smartphones is dangerous for children : पालकांसाठी एक महत्वाची बातमी. तुम्ही जर तुमच्या मुलांच्या हातात मोबाईल देत असाल तर थांबा. स्मार्टफोन मुलांच्या हातात देण्याआधी चार वेळा विचार करा. हा स्मार्टफोनचा अतिवापर मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. (Overuse of smartphones is dangerous for children's health) स्मार्टफोनमुळे मुलांचे बालपण हतवत आहे. मोबाईलच्या अतिवापराने मुलांच्या एकाग्रतेवर परिणाम होत आहे. (Smartphones have a big impact on young kids, disturbing concentration)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Smartphones are addictive : तुमच्या मुलांसाठी ही महत्त्वाची बातमी. तुम्ही तुमच्या मुलांना स्मार्टफोन दिला असाल तर त्यांच्यावर लक्ष ठेवा. मुलं स्मार्टफोनचा अतिवापर करत आहेत का? राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने दिलेल्या माहितीनुसार देशात 37.15 टक्के मुले मोबाईलचा अतिवापर करत असल्याचं समोर आले आहे.



स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मुलांची एकाग्रता कमी होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे 23.80 टक्के मुलं झोपण्यापूर्वी स्मार्टफोनचा वापर करत आहेत. तसेच मैदानी खेळांकडेही मुलांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मोबाईलचा अतिवापर मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहे. याबद्दलची माहिती केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती ईराणी यांनी राज्यसभेत दिली. त्यामुळे तुम्ही मुलांच्या हातात स्मार्टफोन देताना विचार करा, अन्यथा डोक्याला हात लावण्याची वेळ येईल.