`या` लोकांना कमी असतो नैराश्याचा धोका!
व्यक्ती तितक्या प्रकृती, असे म्हटले जाते.
वाशिंगटन : व्यक्ती तितक्या प्रकृती, असे म्हटले जाते. ते अगदी खरे आहे. कारण आपल्या समाजात तऱ्हेतऱ्हची लोक असतात. कोणी शांत तर कोणी बडबडे, कोणी प्रेमळ तर कोणी उग्र, कोणी रागीट, चिडचिडे तर कोणी समजून घेणारे, कोणी स्वार्थी तर कोणी दिलदार.
या लोकांना धोका कमी
याचमुळे आजकालच्या धकाधकीच्या, गुतांगुंतीच्या जीवनशैलीचा प्रत्येकावर होणार परिणाम वेगळा असतो. त्याचबरोबर आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांकडे, घटनांकडे कोण कसे पाहतो, हे प्रत्येकाच्या स्वभावावर अवलंबून असते. अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जे लोक मनमोकळेपणाने बोलणारे आणि कर्तव्यनिष्ठ असतात त्यांना नैराश्य येण्याचा धोका कमी असतो.
हे गुण फायदेशीर...
न्यूरोटिसिज्ममध्ये व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या नकारात्मक भावना दिसून येतात. त्यामुळे मनमिळावूपणा, कर्तव्यनिष्ठा, दिलखुलासपणा, एखादी गोष्ट स्विकारण्याची वृत्ती हे गुण असल्यास नैराश्य येण्याचा धोका कमी असतात. अमेरिकेच्या युनिर्व्हसिटी अॅट बफेलोच्या क्रिस्टीन नारागोन गेनी यांनी सांगितले की, जर कोणी खूप मनमिळावू असेल, समाजोपयोगी काम करत असेल, तर त्याच्या सकारात्मक भावना वाढीस लागतात. अशाचप्रकारे एकाग्रचित्ताने आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करणारे लोक नैराश्यापासून दूर राहतात, असे जर्नल ऑफ रिसर्च इन पर्सनालिटीमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालातून सिद्ध झाले आहे.