dry skin winter care: हिवाळा सुरू होताच आपली स्किन कोरडी  (dry skin) पडू लागते. ज्यांची स्किन आधीपासूनच ड्राय असते अश्यांना तर हिवाळ्यात प्रचंड टेन्शन येतं. जर तुमच्या त्वचेवर लाल रंगाचे डॉट्स (red spots on skin)  किंवा पिलिंग (skin peling) (चेहऱ्याची त्वचा कोरडी होऊन निघू लागणे ) होत असेल किंवा सुरु झालं असेल तर समजून घ्या की, 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला तुमचे रोजच्या वापरातले प्रोडक्टस बदलण्याची वेळ आलेय. तर या हिवाळ्यात कोणत्या प्रोडक्टस पासून तुम्ही लांब राहाल हे पाहणं खूप महत्वाचं आहे. (how to take care of dry skin)


विशेषतः कोरडी त्वचा असलेल्या महिलांसाठी हिवाळा फार त्रासदायक असतो, बऱ्याचदा कोरड्या त्वचेसाठी  उपाय करतो.


अनेक प्रकारच्या क्रीम्स , मॉइस्चरायझर  सगळं वापरतो पण तरीही  फरक पडत  वेळी काय लक्षात ठेवलं पाहिजे आणि कशापासून सावध राहीलं पाहिजे हे आज पाहूया. (how to take care of dry skin in winter season homecare )


त्वचेवर टोमॅटो वापरू नका


तसे, टोमॅटो हे आरोग्य आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. परंतु ते थंड हवामानात वापरले जाऊ नये, कारण त्याचा प्रभाव अम्लीय (acidic) असतो. आम्लयुक्त असल्याने ते तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेल (natural oil in skin) काढून टाकू शकते.


सुगंधी  प्रोड्क्टसपासून लांबच राहा


जर तुमची त्वचा अति ड्राय असेल तर सुंगंधी प्रोड्क्टसपासून तुम्ही लांब च राहिलेलं बरं. असे प्रोडक्टस तुमच्या त्वचेला आणखी इरिटेड करू शकतात. 


एक्सफोलिएशन थांबवा (stop Exfoliating)


काही  एक्सफोलिएट्स तुमच्या स्किन ला आणखी बिघडवू शकतात ज्याने स्किन जास्त ड्राय होते.  एक्सफोलिएटिंग स्किन रुटीनसाठी खूप महत्वपूर्ण आहे मात्र ते रोज करणे केव्हाही अव्हॉइड केलं पाहिजे.   


ग्लाइकोलिक ऍसिड असणारे  प्रोडक्टस ताबडतोब थांबवा  (stop using glycolic products)


ग्लाइकोलिक ऍसिड तुमच्या त्वचेला ड्राय बनवून आणखी खराब करतात. त्यामुळे नेहमी लॅक्टिक ऍसिड (lactic acid) असणारे क्लींजर वापरावे. आणि चेहऱ्याची त्वचा हळुवारपणे स्वच्छ करावी. 


मॉइश्चरायझर लावायला विसरू नका (apply moisturiser everyday)


घरातून बाहेर पडताना चेहऱ्यावर मॉइश्चरायझर जरूर लावा. मॉइश्चरायझर आपल्या त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि सुरकुत्या दूर ठेवते. तुमचे मॉइश्चरायझर निवडताना लक्षात ठेवा की त्यात एसपीएफचे (SPF in moisturiser) गुणधर्म नक्की आहेत जे सनबर्न पासून तुमच्या स्कीनचं संरक्षण करतील.   (how to take care of dry skin )