उन्हाळ्यात घामोळ्यांपासून सुटका कशी मिळवाल? जाणून घ्या `हे` घरगुती उपाय
Prickly Heat Home Remedies: वाढत्या तापमानामुळे अनेकांना घामोळ्यांची समस्या येते. जर तुम्ही पण वाढत्या गर्मीमुळे हैराण असाल तर घराच्या घरी काही सोपे उपाय करून घ्या जेणेकरुन तुम्हाला आराम मिळू शकतो.
Home Remedies for Prickly Heat : महाराष्ट्रसह देशभरात वाढत्या तापमानामुळे (temperature) नागरिक हैराण झाले आहेत. कधी कुठे पाऊस पडत आहे तर कधी ऊन प्रचंड तापले आहे. उन्हाळा हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच तापदायक असतो. परिणामी या ऋतुमध्ये इतर आजारांसोबत त्वचेच्या तीव्र विकारांना सामोरे जावे लागते. कितीही काळजी घेतली तरी उष्णतेमुळे शरीरावर घामोळे येतात. संपूर्ण अंगावर लालसर पुरल आलने असह्य त्रास होतो. या उष्णतेमुळे त्वचेवर लालसरपणा, जळजळ, खाज सुटते. कपालावर, पाठीवार, गळ्यावर, कमरेवर घामोळे येतात. या घामोळ्यांमुळे अंगवार कपडे घालणे अनेकदा कठीण होऊन जाते. पण तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही, कारण आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुमची घामोळ्यांपासून सुटका होऊ शकते. (home remedies may magically cure summer heat rash )
घामोळ्यांवर घरीच करा हे उपाय
खोबरेल तेल : घामोळ्यांपासून सुटका मिळवण्यासाठी खोबरेल तेलात थोडा कापूर मिसळा. त्यानंतर हे तेल संपूर्ण शरीरावर मालिश करा. हा उपाय केल्याने घामोळ्यांपासून आराम मिळेल.
काकडी: काकडी हे घामोळयांवर उपचारांसाठी फायदेशीर ठरु शकते. एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस आणि काकडीचे पातळ काप टाका. आता हे तुकडे जिथे घामोळे उठले आहेत त्या भागावर हळूवारपणे लावा. थोडावेळ तसेच ठेवा. यामुळे तुम्हाल खुपच आराम मिळेल.
वाचा : चुकूनही घेऊ नका 'या' नंबरवरील Whatsapp Call, अन्यथा बॅक खाते होईल रिकामी!
मुलतानी माती: मुलतानी मातीमध्ये वेदनाशामक आणि दाहविरोधी गुणधर्म आहे ज्यामुळे त्वचेवरील पुरळ, घामोळ्यांमुळे उष्णता, खाज कमी होते. यावर उपाय करण्यासाठी दोन चमचे मुलतानी मातीमध्ये थोडेसे गुलाबजल मिसळून प्रभावित भागावर लावा. ही पेस्ट सुकल्यावर धुवा. असे काही दिवस सतत करा.
तुळस: तुळशीचे पाने बारीक करून त्याची पावडर बनवून घ्यावी. त्यानंतर ती पावडर घामोळयांवर लावा. यामुळे तुम्हाला जळजळ होणार नाही.
बर्फ: जर तुम्हाला घामोळ्यांमुळे जळजळ होत असेल तर बर्फाचे तुकडे कापसाच्या कपड्यात गुंडाळा आणि घामोळ्यांवर लावा. यामुळे जळजळ आणि खाज सुटण्यासोबतच वाढत्या उष्णतेपासूनही आराम मिळेल.
बटाटा: वाढत्या घामोळ्यांवर बटाटा हा फायदेशीर ठरु शकतो. बटाट्यामधील गुणधर्म त्वचेला शांत करण्यात आणि खाजेपासून आराम देण्यात मदत करतात. यासाठी एक बटाटा कापून तो घामोळ्यांवर लावा. कमीतकमी 15 मिनिटे ठेवा आणि नंतर थोडे पाण्याने स्वच्छ धुवा.
ओट्स: ओट्समुळे उष्णतेत होणाऱ्या त्रासापासून आराम मिळू शकतो. ओट्सच्या चिकटपणामुळे खाज, मुरुम आणि पुरळ यामुळे जाणवणारी उष्णता कमी होते. यासाठी तुम्ही एक कप ओटची बारीक पावडर घ्या आणि पाण्यात मिसळा. पेस्ट ज्या भागी जळजळ होत असेल तिथे लावा आणि कमीतकमी 15 मिनिटे ठेवा.
बेकिंग सोडा: बेकिंग सोडा उष्मा पुरळ, खाज इत्यादी उपचारांमध्ये मदत करू शकते. सोड्यामधील एक्सफोलिएटर घटक तुमच्या शरीरातील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकतात. यामुळे घामोळ्यांवर उपचार करण्यासाठी थंड पाण्यात खाण्याचा सोडा टाकून त्या पाण्यात कपडा टाकून प्रभावी भागवर लावा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)