सोनाली बेंंद्रे सामना करत असलेला High Grade Cancer म्हणजे नेमके काय ?
बुधवारी अभिनेत्री सोनाली बेंद्रेने सोशलमीडियावर केलेल्या पोस्टमुळे बॉलिवूडसोबतच तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
मुंबई : बुधवारी अभिनेत्री सोनाली बेंद्रेने सोशलमीडियावर केलेल्या पोस्टमुळे बॉलिवूडसोबतच तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत 'इंडियाज बेेस्ट ड्रामेबाज' या रिएलिटी शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसणारी सोनाली अचानक गायब झाली. आज सोनालीने तिला कॅन्सर असल्याची पोस्ट लिहली आहे. या पोस्टमध्ये सोनाली 'हाय ग्रेड' कॅन्सरशी साममा करत असल्याचे तिनं स्पष्ट केलं आहे. मग 'हाय ग्रेड कॅन्सर' म्हणजे नेमके काय? हा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. पहा कॅन्सरशी सामना करत असलेली सोनाली बेंद्रे सोशल मीडियावर काय म्हणाली
सोनाली बेंद्रेवर सध्या अमेरिकेत उपचार सुरू आहेत. नेमका सोनालीला कोणता कॅन्सर आहे याची माहिती देण्यात आलेली नसली तरीही तो हाय ग्रेड कॅन्सर आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांकडून ती या आजारावर मात करून लवकर बाहेर पडावी अशी प्रार्थना केली जात आहे.
high-grade cancer म्हणजे काय?
WebMD नुसार, कॅन्सरचे निदान हे I ते IV अशा स्तरावर केले जाते, IV म्हणजे रोमन अंकातील 4. हा स्तर म्हणजे कॅन्सरची अति गंभीर स्थिती दर्शवते. शरीरात कॅन्सरचा ट्युमर किती प्रमाणात पसरला आहे. कोणकोणत्या अवयवात पसरला आहे. यावर त्याची गंभीरता ठरते.
हाय ग्रेड कॅन्सरमध्ये, कॅन्सरच्या पेशी सामान्य पेशींपेक्षा वेगळ्या दिसतात. हाय ग्रेड कॅन्सर अधिक वेगाने पसरतो. हे आरोग्याला धोकादायक आहे. त्यामुळे त्याची उपचारपद्धती वेगळी असते.
लो ग्रेड कॅन्सरमध्ये कॅन्सरच्या पेशी या सामान्यपेशींप्रमाणेच दिसतात. तसेच यांचे शरीरात वाढण्याचे प्रमाणही हळूहळू असते.
कॅन्सरचा स्टेज काय सांगतो?
स्टेज 0 म्हणजे कॅन्सर नाही. केवळ शरीरातील अनियमित सेल्स भविष्यात कॅन्सरचं रूप धारण करू शकतात.
स्टेज 1 म्हणजे लहान स्वरूपातील आणि एकाच ठिकाणी वाढत असलेला कॅन्सर. हा सुरूवातीच्या टप्प्यातील कॅन्सर आहे.
स्टेज II आणि III म्हणजे कॅन्सर हा टिश्यू आणि लिम्फ नॉड्समध्ये पसरला आहे.
स्टेज IV म्हणजे कॅन्सर हा शरीरात अनेक अवयवांमध्ये पसरला आहे. हा कॅन्सर अॅडव्हान्स किंवा metastatic cancer समजला जातो.
कॅन्सर स्टेजिंगची गरज काय?
अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या माहितीनुसार, स्टेजिंगमुळे शरीरात नेमका किती प्रमाणात कॅन्सर पसरला आहे? कोठे आहे? याची माहिती मिळते.