मुंबई : केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून देशातल्या नागरिकांसाठी उष्णतेपासून बचावासाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. राजस्थान, चुरु येथे ५० डिग्रीहून अधिक तापमान आहे. तसेच महाराष्ट्रात विदर्भ, मध्य प्रदेश, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, चंदीगड या राज्यातही उन्हाचा प्रकोप वाढला असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे.


आरोग्य विभागाने केलेल्या सूचना  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. चहा, कॉफी, मद्यप्राशन सर्वप्रथम टाळा 
२. मोकळी कपडे आणि फिक्या रंगाची कपडे वापरा
३. गरज असेल तरच घराबाहेर पडा,
४. दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर जाणे टाळा.
५. दररोज चार ते पाच लीटर पाणी प्या 
६. डोक्यावर छत्री, टोपी, रुमाल वापरावा
७. मीठ असलेले ज्यूस, थंड पेय ,लिंबू रस, ओआरएस प्या
८. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना त्रास होत असेल तर घराबाहेर पडू नये,
९. थंड ठिकाणी थांबावे, पंखा, कूलरचा वापर करा
 
याबाबत डॉ. मधुकर गायकवाड यांनी उन्हापासून काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. जास्तीत जास्त पाणी प्या. गरज असेल तर उन्हातून बाहेर पडा. मात्र, उन्हातून जाताना आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. छत्री, टोपी यांचा वापर प्राधान्य केला पाहिजे. त्यामुळे उन्हापासून आपला बचाव होऊ शकतो.