Sri Sri Ravi Shankar यांनी शेअर केल्या त्यांच्या आजीच्या हेल्थ टिप्स, शतायुषी व्हाल!
Sri Sri Ravi Shankar Health Tips : आताच्या काळात निरोगी राहण अत्यंत महत्त्वाच आहे. अशावेळी श्री श्री रवी शंकर यांनी सांगितल्या 5 हेल्थ टिप्स
Long Life Health Tips from Sri Sri Ravi Shankar : सुदृढ राहणं म्हणजे फक्त शारिरीक आरोग्य गरजेचं नाही. तर यावेळी मानसिक आरोग्याला देखील तितकंच महत्त्वाच आहे. असं असताना आपण नेमकं काय फॉलो करायचं हे कळत नाही. श्री श्री रवी शंकर आपल्या आजीच्या हेल्थ टिप्स शेअर करत आपला आरोग्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला आहे. या टिप्स कुणीही फॉलो करू शकतो, हे या टिप्सचं खास वैशिष्ट्य आहे.
(फोटो सौजन्य - Sri Sri Ravi Shankar Instagram / iStock)
प्रोटीन-कार्बोहायड्रेट पदार्थ
श्री श्री रविशंकर यांनी आहार आणि पोषणाद्वारे फिटनेस वाढवण्याचे मार्ग सांगितले आहेत. ते म्हणाले, 'आपल्या शिक्षण व्यवस्थेत हे शिकवले जाते की नाही माहीत नाही, पण मुलांना पोषणाची माहिती असली पाहिजे. प्रथिने, कार्ब किंवा इतर पोषणाची गरज किंवा कार्य काय आहे हे मुलांना चांगले माहित असले पाहिजे. आपण काय आणि किती खावे हे त्यांना कळले पाहिजे.
आजीचा आहार
श्री श्री रविशंकर यांनी सांगितले की त्यांच्या आजीच्या जेवणात नेहमीच पालक असतो. त्या रोज वेगवेगळ्या हिरव्या पालेभाज्या खात असतं. एकादशीचे व्रत पाळण्यात आले आणि तिखट चवीची पाने, कारले आणि अनेक आरोग्यदायी भाज्या खाल्ल्या. आजीच्या आहारात कायमच दही, कोशिंबीर आणि डाळ यांचा नियमित समावेश होता.
ताटात नाही तर पानावर जेवणे चांगले
श्री श्री रवीशंकर यांनी जर्मन किंवा स्टीलच्या ताटात न जेवता केळीच्या पानावर जेवण्याचे फायदे सांगितले आहेत. केळीच्या पानावर जेवणाचे खूप फायदे आहेत.
असा असावा डाएट
श्री श्री रविशंकर यांच्या मते, तुम्ही योग्य प्रमाणात योग्य अन्न खावे. शाकाहारी, पौष्टिक, हलका आणि पचायला हलका असा आहार घ्यावा. शुद्ध मध, आले, बदाम, बिया आणि ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन करण्याचे सुनिश्चित करा.
हे पदार्थ टाळा
श्री श्री रविशंकर सांगतात की, शिळ अन्न, खूप काळ आधी शिजवून ठेवलेलं अन्न, खूप तेल, मसाले आणि साखरेसारखे पदार्थ टाळावेत. मांसाहार, लसूण-कांद्याचा अधिक वापर या पदार्थांमुळे आळस आणि थकवा अधिक वाढतो. त्यांनी प्रोसेस्ड, फ्रोझन आणि कॅन फूड खायला मनाई केली आहे.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)