मुंबई : आजच्या धावपळीच्या जगात स्वत:ला फिट ठेवणं हे सगळ्यांसमोर असलेलं आवाहन आहे. अनेक देशांमध्ये  निरोगी शरीर आणि जीवनशैलीबाबत याबाबत जागरूकता वाढवली जात आहे. नागरिकांच्या निरोगी जीवनशैलीसाठी काही देश स्वत: हून पुढाकार घेत चांगल्या मोहिम राबवत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागरिकांना निरोगी जीवनशैलीकडे आकर्षित करण्यासाठी युनायटेड किंगडम अर्थात यूकेने एक नवीन मोहीम सुरू केली आहे. येथील सरकारने घोषित केले आहे की, जो वजन कमी करेल,फिट राहिल त्याला रोख बक्षीस देण्यात येईल. 


जगातील काही देशांपैकी एक असलेल्या यूकेमध्ये लठ्ठपणा ही एक मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे आता लोकांना कसरत करण्यासाठी आणि फळं आणि भाज्या खाण्यास प्रवृत्त केले जात आहे.



अ‍ॅपच्या मदतीने ठेवली जाणार नजर


 यूकेमधील सरकार वजन कमी करण्यासाठीची सेवा वाढवण्याचा विचार करत आहे. निरोगी जीवनशैली राखणाऱ्या कुटुंबांना रोख बक्षीस देण्याची सरकारची तयारी आहे. सरकारच्या या आरोग्य योजने अंतर्गत एका अ‍ॅपच्या माध्यमातून लोक किती फळे आणि भाज्या खात आहेत यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. 


 देशातील वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने ही मोहिम सुरु केली आहे. सुपरमार्केटमध्ये कुटुंब किती खर्च करते यावरही लक्ष ठेवले जाणार आहे. त्याचे निरीक्षण केले जाणार आहे. किती लोक कॅलरीयुक्त पदार्थांऐवजी फळे आणि भाज्या खरेदी करण्यास प्राधान्य देतात. अशा कुटुंबांना रकार बक्षीस देणार आहे.


700,000 हून अधिक लठ्ठ असलेल्या लोकांसाठी व्यवस्थापन


आरोग्य व सामाजिक सेवा मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य सेवा  यांना 70 दशलक्ष पौंड देण्यात येणार आहेत. तसेच, 700,000 हून अधिक लठ्ठ असलेल्या व्यक्तींची निवड करणे आणि त्यांना वजन व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी पाठविणे ही इंग्लंडच्या परिषदांची जबाबदारी असणार आहे.


आर्थिक बक्षिसां व्यतिरिक्त, या योजनेअंतर्गत, व्यायामासाठी मोफत तिकिटे, हेल्थ अॅपवर पॉइंट्स उपलब्ध असतील. ज्यांची सवलत म्हणून देवाण-घेवाण करता येईल आणि इतर बक्षिसेही दिली जातील.