दिल्ली : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. तर आता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी सुचवलं की, ज्या लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत त्यांना संपूर्ण लसीकरणाचे स्टिकर द्यावे. इतर कुटुंबांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी हे स्टिकर स्वतःच्या घरावर चिकटवावे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारने नुकतीच महिनाभर चालणारी 'हर घर दस्तक' मोहीम सुरू केली. ज्यामध्ये ज्यांना अद्याप लसीचा एकही डोस मिळालेला नाही किंवा त्यांना दुसरा डोस मिळायचा आहे अशांना घरोघरी जाऊन लसीकरण केलंय. 


केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, भारताच्या लसीकरण कार्यक्रमासारख्या मोठ्या मोहिमेसाठी लोकांचा आवश्यक आहे. एनजीओ आणि नागरी संस्थांच्या पुढाकारामुळे भारत कोविड-19 संकटातून बाहेर आला. 



निवेदनानुसार, मंत्र्यांनी अनुक्रमे 80 टक्के लोकसंख्येला आणि 40 टक्के लोकसंख्येला लसीचा पहिला आणि दुसरा डोस मिळवून देण्यात त्यांच्या योगदानाचा उल्लेख केला.


उत्तर प्रदेशात असे स्टिकर्स लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात कोविडची लस घेतलेल्या लोकांच्या घराबाहेर लावले जाणारे स्टिकर्स हे सांगतील की, हे कुटुंब कोविड लसीपासून पूर्णपणे सुरक्षित आहे. यामुळे कोणत्याही कुटुंबाला आणि सदस्याला कोरोना लसीकरणापासून सूट मिळणार नाही. तर लसीकरण न झालेल्यांचा शोध घेतल्यानंतर आरोग्य कर्मचारी लसीकरण करतील.