मुंबई : सध्याच्या जीवनशैलीमुळे पोटात गॅस होणं ही एक सामान्य गोष्ट आहे. अनेक वेळा आपण याकडे किरकोळ समस्या समजून दुर्लक्ष करतो. मात्र असं करणं फार धोकादायक ठरू शकतं याची तुम्हाला कल्पना आहे का? गॅसची समस्या वाढली की पोटात प्रचंड वेदना होऊ शकतात. पोटात गडबड झाली दररोजच्या कामातही अडचणी येतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोटात गॅस झाल्यास दैनंदीन जीवनंही कठीण होऊन बसतं. अशा परिस्थितीत, या समस्येचं कारण काय आहे आणि या समस्येपासून मुक्त कसं व्हावं हे जाणून घेणं आवश्यक आहे.


पोटात गॅस होण्याची कारणं


  • काही लोकं सकाळी उठल्याबरोबर चहा पितात. याला बेड-टी असं म्हटलं जातं. काहीही खाल्याशिवाय चहा प्यायल्यास एसिडिटीसारखा त्रास होऊ शकतो. परिणामी पोटात गॅस होण्याची समस्या वाढते.

  • सध्याच्या व्यस्त वेळापत्रकामध्ये अनेकजण घाईघाईत जेवतात. मात्र घाईघाईत जेवल्याने पचनाला त्रास होतो आणि हीच समस्या पुढे जाऊन गॅसचं रूप धारण करते. 

  • जर तुम्ही लॅक्टोस दूध किंवा त्यापासून बनलेल्या प्रोडक्स जास्त खात किंवा पित असाल तर यामुळे गॅस होण्याची समस्या वाढू शकते. त्यामुळे अशा पदार्थांचं सेवन करताना तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. 


गॅसच्या समस्येपासून सुटका कशी कराल


  • बडीशेपचे पाणी प्यायल्याने पोटाचा त्रास दूर होतो. यासाठी रात्री बडीशेप पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी त्याचं पाणी प्या.

  • जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणं टाळा, याशिवाय फास्ट फूड आणि जंक फूडपासून दूर राहा

  • एका छोट्या भांड्यात पाणी घेऊन त्यात आलं टाकून उकळा, कोमट झाल्यावर ते प्या.