हाडांची मजबूती आरोग्यास अत्यंत गरजेची
संतुलित आहार आपल्याला लहान वयापासून मजबूत हाडे तयार करण्यास मदत करते.
मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाचे आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. खाण्याचे सतत बदलते वेळापत्रक, बदलती जीवनशैली इत्यादी गोष्टींचा परिणाम थेट आरोग्यावर होताना दिसत आहे. आरोग्य राखण्यासाठी हाडांची मजबूती अत्यंत गरजेची आहे. संतुलित आहार आपल्याला लहान वयापासून मजबूत हाडे तयार करण्यास मदत करते. शरीरात कॅल्शियम शोषण्यास मदत करण्यासाठी 'ड' जीवनसत्त्वाची गरज असते. हाडे मजबूत करण्यासाठी पुरेसे कॅल्शियम आवश्यक आहे.
म्हणून हाडे बळकट होण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश नक्की करा...
- माशांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. त्याचबरोबर माशांमधील ओमेगा ३ फॅटी अॅसिडमुळे हाडांची झीज होत नाही.
- पालेभाज्या या कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे पालक, मेथी, कोबी, ब्रोकोली
- अंड्यात प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. त्याचबरोबर त्यातील व्हिटॉमिन डी हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर ठरतात.
- संत्र्यातील व्हिटॉमिन सी हाडे बळकट करण्यासाठी उत्तम ठरतं.
- बदाम देखील आरोग्यास अत्यंत लाभदायक आहे. पोटॅशियम, ओमेगा ३ फॅटी अॅसिड, कॅल्शियम यांसारखे घटक बदामत असल्याने ते हाडे बळकट होण्यासाठी फायदेशीर ठरतात.
- ऑस्टियोपिरॉसिस असलेल्या महिलांसाठी मुठभर मनुके खाणे गरजेचे आहे. त्यात इनुलिन नावाचे फायबर असते जे शरीरासाठी कॅल्शियमचे शोषण करण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते. अर्थरायटिसच्या समस्येवरही मनुके खाणे फायदेशीर ठरते.
- केळ्यात पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम याचे प्रमाण अधिक असते. हे तीनही घटक हाडांच्या मजबूतीसाठी मदत करतात.