अचानक राग, संय गमावणे आणि ओरडणे.., जया बच्चन यांना `या` आजारामुळे होत्या त्रास
Jaya Bachchan : Paparazzi जया बच्चन कायम ओरडताना, संतापताना दिसली आहे. त्या कायम रागात का असतात असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अचानक राग, संय गमावणे आणि ओरडणे ही लक्षण एका आजाराची असून जया बच्चन यांनाही तो आजार आहे का?
Jaya Bachchan Suffering from Claustrophobia : वयाच्या 15 वर्षापासून चित्रपटसृष्टीत अभिनयाच्या जोरावर आपली जागा निर्माण करणाऱ्या जया बच्चन यांचा आज 75 वा वाढदिवस आहे. रोमँटिक सीन असो आईची भूमिका त्या प्रत्येक भूमिकेला न्याय देतात. अमिताभ बच्चन आणि मुलांसाठी त्यांनी करिअरला ब्रेक लावला होता. सर्व जबाबदारी पूर्ण करुन त्यांनीन पुन्हा चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री केली. आज त्यात चित्रपटात नाही तर संसदमध्येही आपली भूमिका अतिशय चांगल्या रितेने सांभाळतात. पण त्या जेव्हा कधी पापराझींना भेटतात तेव्हा त्या वैतागलेल्या, संतापलेला आणि रागीट दिसतात. चाहत्यांपासून सर्वांना हा प्रश्न पडला आहे त्या नेमकं असं का करतात? (Sudden anger loss of composure and shouting Jaya Bachchan suffers from Claustrophobia disease)
'या' आजारपणामुळे त्या त्रस्त!
अमिताभ आणि जया बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन हिने त्यांच्या या वागण्याबद्दल सांगितलं होतं. जया बच्चन यांच्या या मागण्यामागे क्लॉस्ट्रोफोबिया हा आजार आहे. या आजारपणामध्ये व्यक्तीला आपल्या रागावर, आपल्या वागण्यावर नियंत्रण नसतं. क्लॉस्ट्रोफोबिया असणाऱ्या व्यक्तीमध्ये कोणते लक्षण दिसतात ते पाहूयात.
क्लॉस्ट्रोफोबिया स्थितीची लक्षणे
क्लॉस्टरोफोबिया कंडिशन ही एक प्रकारची मानसिक समस्या आहे. या आजाराने ग्रस्त लोक जेव्हा गर्दीत जातात त्यांना राग येतो. या लोकांना गर्दी, जास्त लोक किंवा बंद ठिकाणनी त्रास होत असतो. याशिवाय त्यांना खालील लक्षणं दिसून येतात.
घाम येणे
कंपन
श्वासोच्छवासाच्या समस्या
हृदयाच्या ठोक्यात अचानक वाढ
छातीत दुखणे
डोकेदुखी आणि बेहोशी
कोरडे तोंड
हेसुद्धा वाचा - PHOTO : लहानपणापासून चित्रपटात काम, सुपरस्टारची पत्नी आता खासदार, आज आहे 1578 कोटींची मालकीण
क्लॉस्ट्रोफोबियावर उपचार आहे का?
क्लॉस्ट्रोफोबियाच्या स्थितीबद्दल अनेकांना याबद्दल माहिती नाही किंवा या आजाराबद्दल कोणी फार बोलत नाही. पण क्लॉस्ट्रोफोबिया झालेल्या व्यक्तीला मानसशास्त्रज्ञांच्या मदतीने उपचार केला जातो. शिवाय बिहेवियरल थेरपीची मदत घेतली जाते. गरज भासल्यास रुग्णाला अँटीडिप्रेसंट औषधंही दिली जातात.
या आजारात अनेकांना पॅनीक अटॅक येतो. अशा स्थितीत आजूबाजूला असलेल्या अशा गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं ज्यामुळे तुम्हाला भीती वाटणार नाही. मानसशास्त्र तज्ज्ञ म्हणतात की, पॅनीक अटॅक आल्यानंतर रुग्णाने फिरत्या घड्याळाकडे पाहावं. यामुळे त्यांना दिलासा मिळतो. त्यासोबतच आराम ही आवश्यक गोष्ट आहे.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)