Temperature High And Low During Sleeping: आपल्या प्रत्येकाला पुरेशी झोप ही हवीच असते. जर रात्री तुमची झोप झाली नाही तर दुसऱ्या दिवशी बिलकून फ्रेश वाटत नाही. जर बरेच दिवस तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल तर चिडचिडेपणा वाढण्याची समस्या निर्माण होऊ शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झोप पूर्ण न होण्यामागे वारंवार झोप न लागणं किंवा रात्री चांगली झोप न लागणं ही कारणं असू शकतात. काहींना रात्री झोपताना खूप गरम होऊ लागतं तर काहींना थंडीमुळे झोप येत नाही. आता प्रश्न असा उपस्थित होतो की, रात्री अचानक थंड किंवा गरम वाटण्यामागे कारण काय असू शकतं. 
एका संशोधनात असं आढळून आलं होतं की, शरीरातील निर्जलीकरणामुळे शरीराचे तापमान बदलण्याची शक्यता असते. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे झोपेचा त्रास होतो. अशा परिस्थितीत शरीराचं तापमान नियंत्रणात ठेवायचं असेल तर काय केलं पाहिजे हे जाणून घेऊया.


डॉक्टरांच्या मते, झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान नियंत्रणात राहते. यामुळे तुम्हाला दिवसभर हायड्रेटेड राहते. जर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तर यामुळे झोपताना तुमच्या शरीराच्या तापमानात अचानक बदल झाल्याचं दिसून येऊ शकतं. म्हणजेच अशावेळी तुम्हाला खूप गरम किंवा थंड वाटण्याची शक्यता आहे. 


तुमच्या शरीराच्या तापमानाला पाणी नियंत्रणात आणू शकतं


तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणं कधीही उत्तम. झोपण्यापूर्वी पाण्याचा औषधासारखाच प्रभाव असतो. जर तुम्ही खोलीच्या तापमानानुसार, पाणी प्याल तर तुम्हाला सकाळी फ्रेश वाटण्यास मदत होईल. इतकंच नव्हे तर रात्रीच्या वेळे पाणी प्यायल्याने तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.


आता तुमच्या मनात प्रश्न असेल की, रात्री झोपण्यापूर्वी थंड की गरम कसं पाणी प्यायलं पाहिजे? तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रात्री कोमट पाणी पिणं तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतं. थंडीच्या दिवसात कोमट पाणी प्यावे. शक्यतो रात्रीच्या वेळी थंड पाणी पिणं टाळावं पाहिजे. यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)