मुंबई : खाण्याच्या, झोपण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकांमध्ये बद्धकोष्ठतेचा त्रास वाढत आहे. या त्रासामुळे काही पदार्थांच्या सेवनाचा आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणूनच बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी औषधोपचारांसोबतच आहारामध्ये काही बदल करणे आवश्यक आहेत. बद्धकोष्ठतेचा वारंवार त्रास होत असेल तर लोक अनेकदा वेगवेगळी औषधे घेतात. या औषधांचा चुकीचा परिणामही आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. जर तुमचेही पोट साफ होत नसेल तर रात्री झोपण्याआधी खालील उपाय करा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मातीच्या भांड्यात त्रिफळा पावडर भिजवा. त्यानंतर हे पाणी गाळून प्या.
भिजवलेल्या अळशीचे पाणी प्या आणि अळशी चावून खा.
एक चमचा इसबगोलची पावडर दुधात वा पाण्यात मिसळून प्या.
थोडेसे मनुके पाण्यात भिजवा. हे पाणी प्या आणि मनुके चावून खा.


रात्री हे करुन नका


रात्रीच्या जेवणात जंक फूड वा प्रोसेस्ड पदार्ख खाऊ नका. या पदार्थांमध्ये फायबर नसते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. 
रात्री उशिरा दारु वा सिगारेट प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता जाणवते
आयर्न वा कॅल्शियमच्या सप्लिमेंट घेत असल्यास त्या रात्री घेऊ नका. यामुळेही बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
रात्रीचे दुधाचे पदार्थ खाऊ नका.
रात्री उशिरा चहा वा कॉफीचे सेवन करा. यामुळे पाचनक्रिया बिघडते.