लिव्हर आणि किडनीसाठी फायदेशीर आहे ऊसाचा रस
ब्राझीलनंतर भारतात ऊसाचे सर्वाधिक उत्पादन होते. ऊसाच्या रसापासून बनवली जाणार साखर आणि गूळव्यतिरिक्त ऊसाच्या रसाचेही सेवन केले जाते.
मुंबई : ब्राझीलनंतर भारतात ऊसाचे सर्वाधिक उत्पादन होते. ऊसाच्या रसापासून बनवली जाणार साखर आणि गूळव्यतिरिक्त ऊसाच्या रसाचेही सेवन केले जाते. ऊसाचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याच्यात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे पाचनतंत्र सुरळीत राहते. ऊसाच्या रसात लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि अनेक प्रकारचे इलेक्ट्रोलाइट्स असतात. ज्यामुळे शरीर डिहायड्रेट होत नाही. शरीरातील प्रोटीन लेव्हल वाढवण्याचे काम ऊसाचे रस करते. तसेच ताप,व्हायरल फीव्हरपासून लढण्यास मदत करतो.
अनेक आजारांवरही ऊसाचा रस फायदेशीर आहे. ऊसाचा रस मूत्रवर्धक असतो. युरिनसंबंधित समस्या असल्यास ऊसाचा रस प्यावा. तसेच मूतखड्यापासून ऊसाचा रस बचाव करतो. किडनीचे काम सुरळीतपणे चालण्यासाठी ऊसाचा रस फायदेशीर ठरतो. हे एक महत्त्वपूर्ण औषध आहे. लीव्हरसाठीही ऊसाचा रस चांगला.
काविळीवर तर ऊसाच्या रसाचे सेवन वरदान ठरते. काविळीमध्ये शरीरातील द्रव्यामध्ये बिलरुबिनचे प्रमाण वाढते. यामुळे त्वचा पिवळी पडते. अशा वेळेस ऊसाच्या रसाने शरीरात प्रोटीन आणि अन्य पोषक तत्वांची कमतरता भरुन निघते. ऊसाच्या रसात ग्लायकेमिक इंडेक्स खूप कमी होतोय त्यामुळे डायबिटीजच्या रुग्णासाठी हा रस फायदेशीर ठरतो.
यात मोठ्या प्रमाणात खनिजे आढळतात. दातांसंबंधित समस्यांवरही ऊसाचा रसही फायदेशीर ठरतो. मुखदुर्गंधीचा त्रास असल्यास ऊसाच्या रसाचे सेवन केले पाहिजे. यामुळे फायदा होतो.