मुंबई :  वाढलेलं ऊन आणि सतत वाहणाऱ्या घामाच्या धारा यामुळे टाळू, केस चिकचिकीत होतात व केसांच्या अनेक समस्या उद्भवतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या उन्हाळ्यात ऊन व घामामुळे होणारे केसांचे नुकसान टाळण्यासाठी आणि केसांचे सौंदर्य राखण्यासाठी हे उपाय नक्की ट्राय करा. हे उपाय केसांसाठी अत्यंत फायदेशीर असून करण्यास देखील सोपे आहे.


ग्रीन टी: 


नेहमीप्रमाणे केस धुवा आणि शेवटी ग्रीन टी ने केस धुवा. ग्रीन टी मुळे केस वाढतात आणि त्यात असलेल्या सनस्क्रीन गुणधर्मांमुळे उन्हापासून केसांचे संरक्षण होते.


जास्वंद: 


जास्वंद केशवर्धक असल्याचे आपण सगळेच जाणतो. शॅम्पू आणि कंडिशनरने केस धुण्यापूर्वी जास्वंदीची फुले पाण्यात उकळवा व त्या पाण्याचा वापर केस धुण्यासाठी करा.


अॅपल सायडर व्हिनेगर: 


१ मोठा कप थंड पाण्यात त्यापेक्षा निम्मं अॅपल सायडर व्हिनेगर घालून केस धुवा. केस चमकदार होतील.


बियर: 


आपल्यापैकी बऱ्याचजणांना बियरचे सौंदर्यवर्धक फायदे माहित आहेत. बियरमुळे केस व त्वचा चमकदार होते. पाण्यात अर्धा कप बीयर घालून केस धुवा आणि फरक अनुभवा.


ब्लॅक टी: 


ग्रीन टी प्रमाणे यामध्ये देखील केसवाढीचे गुणधर्म असतात. ब्लॅक टी मध्ये असलेल्या कॅफेनमुळे केसांची वाढ होते. उन्हाळ्यात केस धुण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.