मुंबई : पावसाळ्या उद्भवणाऱ्या अनेक समस्यांपैकी अजून एक समस्या म्हणजे सॉक्स (मोजे) ओले होणे. अशावेळी कधी एकदा ते सॉक्स काढतो, असे होते. पण तुम्हाला माहित आहे का? ओले मोजे घालण्याचे काही आश्चर्यकारक फायदे देखील आहेत. जाणून घेऊया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ताप किंवा सर्दी असल्यास ओल्या सॉक्सचा हा प्रयोग करुन पाहा. तात्काळ फरक दिसेल.


पोटाची समस्या


पोटाच्या समस्यांनी त्रस्त असाल तर पाण्यात काळ्या जिऱ्यासोबत बडिशेप देखील १० मिनिटे उकळवा. या पाण्यात सॉक्स बुडवून पायात घाला. खराब पोटाची समस्या दूर पळेल.


ताप


घरात कोणाला खूप ताप आल्यास व्हिनेगरच्या पाण्यात सॉक्स ओले करा. त्यातील अतिरिक्त पाणी पिळून ताप आलेल्या व्यक्तीच्या पायात घाला. ताप लवकर उतरेल.


सर्दी


तुम्हाला जर वारंवार सर्दी होत असेल तर कांद्याच्या रसात चमचाभर मध मिसळून त्यात सॉक्स ओले करा आणि पिळून पायात घाला.