मूतखड्यावर रामबाण उपाय सापडला, शरीरातच नष्ट होणार खडा
मुतखड्याचा त्रास अत्यंत वेदनादायी असतो.
सतिश मोहिते झी मीडिया नांदेड : मुतखड्याचा त्रास अत्यंत वेदनादायी असतो. वेळीच त्याचा धोका ओळखता आला नाही तर दिवसेंदिवस त्रास वाढतो. मुतखड्याचा आकार वाढल्यानंतर शस्त्रक्रियेने तो बाहेर काढावा लागतो. मात्र आता मुतखड्याचा त्रास असणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आली आहे.
मुतखड्याच्या आजारावर आता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने प्रभावी औषध शोधल्याचा दावा केलाय.. या औषधाला मान्यताही मिळाली असून अशा प्रकारचं औषध बनवणारं नांदेडचं विद्यापीठ राज्यातलं पहिलंच विद्यापीठ ठरलंय.
मूतखड्यावर प्रभावी औषध
मुतखडा शरीरातच कसा नष्ट करता येईल यासाठी नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाने संशोधन सुरु केलं... स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ जैवशास्त्र संकुल, औषधी वनस्पती आणि भुमी औषधनिर्मिती कंपनी वसमत तसेच कलस औषध निर्मिती कंपनी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा संशोधन प्रकल्प राबवला गेला... 10 वर्षे त्यावर संशोधन करण्यात आले... प्रयोगशाळेतील उंदरांवर आणि त्यानंतर 100 रुग्णांवर औषधाचा यशस्वी प्रयोग करण्यात आला... अन्न औषध प्रशानाची परवानगी तसेच भारत सरकारकडून त्याचे पेटेंट घेण्यात आले... आता डिसोकॅल नावाने अतिशय माफक दरात ही औषधी बाजारात आणली जात आहेत.
विद्यापिठांमध्ये अनेक विषयांवर तज्ञ प्राध्यापक मंडळी आणि विद्यार्थी संशोधन करतात. त्याचा फायदा समाज हितासाठी होणे अपेक्षित आहे... मुतखडा या अतिशय वेगाने वाढत चाललेल्या आजारावर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठाने प्रभावी औषध शोधले आणि त्याचा फायदा आता गरीब रुग्णांना होणार आहे. मूतखड्याचा त्रास नेमका कशामुळे होतो?
डिसोकॅल औषध
डिसोकॅल हे औषध गोळ्यांच्या रुपात उपलब्ध करण्यात आले आहे. कमी पैश्यांमध्ये उपचार होणार असल्याने मुतखड्याच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. मूतखडा टाळायचाय ? 'या' पदार्थांपासून रहा दूर