Heart Attack Symptoms in Marathi: लहानपणापासून आपल्याला सकाळी उठायची सवय लावली जाते. सकाळी लवकर उठल्यानंतर ताजंतवानं वाटतं त्याचबरोबर दिवसभराची उर्जादेखील मिळते. सकाळीच मेडिटेशन आणि व्यायाम करणे चांगले मानले जाते. त्यामुळं लहानपणापासून सकाळी लवकर उठण्याची सवय लावली जाते. त्याचबरोबर सकाळी हार्ट अॅटेकचा धोकादेखील निर्माण होतो. झोपेतून उठल्यानंतर हार्ट अॅटेकचे लक्षण सर्वाधिक जाणवतात, असं एका अहवालात समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसनच्या एका शोधप्रबंधात म्हटलं गेलं आहे की, सकाळी 6 वाजल्यापासून ते दुपारपर्यंत हार्ट अॅटेक येण्याचा धोका 40 टक्के जास्त असतो. कारण झोपेत असताना रक्त घट्ट झालेले असते. झोपेतून उठल्यानंतर दिसणारे हार्ट अॅटेकचे सुरुवातीच्या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करु नका. या लक्षणांकडे वेळेत लक्ष दिल्यास हृदय रोगाचा धोका कमी होऊ शकतो. जाणून घ्या ही लक्षणे


घाम फुटणे


सकाळी उठल्यानंतर दरदरून घाम फुटत असेल तर समजून घ्या की तुमच्या हृदयाला जास्त मेहनत करावी लागते. रक्त घट्ट झाल्यामुलं ब्लड पंप करण्यासाठी हृदयावर जास्त प्रेशर होते. ज्यामुळं झोपताना घाम फुटू शकतो. 


डावा हात


डाव्या जबड्यापासून डाव्या हातापर्यंत वेदना पसरणे हे हृदयविकाराच्या मुख्य लक्षणांपैकी एक आहे. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर डावा हात दुखत असेल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.


धाप लागणे


हृदयविकाराच्या झटक्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि गुदमरल्यासारखे वाटू शकते. यामुळे झोपेचा अचानक खंड पडू शकतो किंवा सकाळी उठल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. या लक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.


छाती भरलेली वाटते


हृदयविकाराच्या झटक्याने छातीत दुखते, जे पाठीपर्यंत जाणवते. या दरम्यान, छातीवर जडपणा किंवा घट्टपणा जाणवू शकतो. अशावेळी झोपेतून उठल्यानंतर श्वास घेण्यास अडथळा आल्यास या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. 


मळमळणे


मॉर्निंग सिकनेसमध्ये उलटी येणे किंवा मळमळणे असा त्रास होणे सामान्य आहे. पण यामागे सायलेंट हार्ट अॅठेकदेखील असू शकते. हृदयाच्या रक्तवाहिनीत अडथळा आल्यावर रुग्णाला उलट्या किंवा मळमळ झाल्यासारखे वाटते. 


हदृरोगांसंबधित आजार टाळण्यासाठी फळे, धान्य, भाज्या, नट्स आणि बिया यांचे सेवन करा. त्याचबरोबर चरबीयुक्त पदार्थांचे सेवन कमी करा. यामुळे उच्च कोलेस्टेरॉल, उच्च ट्रायग्लिसराइड कमी होईल आणि शरीर नैसर्गिकरित्या नसा मोकळ्या होतील.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)