वातावरणात बदल झाल्यास, पावसामुळे चिखल,दलदल वाढली की डासांची उत्त्पत्ती होण्याचं प्रमाणही वाढतं.. यामधूनच डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचा धोका वाढतो. पण या सार्‍यासोबतच महाराष्ट्रभरात स्वाईन फ्लू ची दहशतदेखील वाढत आहे. त्याचे वेळीच निदान करण्यासाठी थोडी सजगता आणि प्रतिबंधक उपायांची गरज आहे. मग ही स्वाईन फ्लूची टेस्ट नेमकी प्रायव्हेट मेडिकल सेंटर/ हॉस्पिटल्समध्ये करावी की सरकारी हॉस्पिटल्समध्ये या तुमच्या मनातील प्रश्नावर हा खास एक्सपर्ट सल्ला नक्की जाणून घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


स्वाईन फ्लु टेस्ट कीट –


स्वाईन फ्लूच्या टेस्टींगसाठी खाजगी आणि सरकारी हॉस्पिटल्समध्येही उत्तम प्रोटोकॉलप्रमाणे मान्य केलेले चांगल्या दर्जाचे कीट वापरले जातात. मात्र स्वाईन फ्लूची टेस्ट योग्य प्रिस्पक्रीप्शनंतरच करण्यास परवानगी दिली जाते. तसेच याकरिता CDC guidelines वापरल्या जातात. त्यामुळे टेस्टिंग कीटला सरकारची परवानगी असणं आवश्यक आहे.


 


स्वाईन फ्लू टेस्ट घरी करता येते का ?  


सरकारी आणि खाजगी टेस्टमध्ये केवळ हाच एक फरक आहे. जर तुम्ही सरकारी केंद्रामध्ये तपासणी करत असाल तर तुम्हांला तेथे प्रत्यक्ष जावे लागते मात्र अनेक खाजगी टेस्टींग सेंटर्स तुमच्या वेळेनुसार घरी येऊनदेखील टेस्ट करू शकतात. तसेच खाजगी सेंटर्स 365 दिवस खुली असल्याने रिपोर्ट्स लवकर मिळण्यास मदत होते. काही वेळेस तुमचा रिपोर्ट फोन वरूनही दिला जातो.


 


कशी असते स्वाईन फ्लू टेस्ट ?


स्वाईन फ्लू टेस्ट ही molecular diagnostic test असते. यामध्ये H1N1 व्हायरसचे डीएनए तपासले जातात.


भारतात 7-8 सरकारमान्य स्वाईन फ्लू टेस्ट सेंटर्स आहेत. त्यामुळे योग्य केंद्रामधूनच स्वाईन फ्लूची टेस्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे चूकीचे निकाल मिळणार नाहीत. तसेच आजाराच्या नावाने किंवा साथीने घाबरून जाऊन स्वतःहून टेस्ट करू नका. डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच स्वाईन फ्लूची टेस्ट करा.


स्वाईन फ्लूच्या टेस्टसाठी कोणतीही पूर्वतयारी लागत नाही. स्वाईन फ्लूच्या टेस्टमध्ये केवळ रक्ताची चाचणी केली जाते. तसेच टेस्ट करणार्‍या व्यक्तीला योग्य गाऊन परिधान करण्याचा आणि मास्क लावण्याचा सल्ला  दिला जातो. यामुळे ते पुरेसे सुरक्षित राहतात.


 


स्वाईन फ्लूच्या टेस्टची किंमत  काय ?


खाजगी मेडीकल टेस्ट सेंटर्सच्या तुलनेत सरकारी हॉस्पिटल्समध्ये टेस्ट करणे कमी खर्चिक असते. सरकारी नियमावलीनुसार स्वाईन फ्लूच्या टेस्टचा खर्च हा सुमारे 4500 रुपये इतका आहे. ऑथराईज्ड सेंटर्समध्येही स्वाईन फ्लू टेस्टचा खर्च इतकाच असतो.


 


स्वाईन फ्लू टेस्टचा निकाल कधी येतो ?


स्वाईन फ्लूच्या टेस्टचा निकाल सामान्यपणे एका दिवसात मिळतो. अगदीच गंभीर स्थिती असेल तर स्वाईन फ्लू टेस्टचा निकाल हा अवघ्या 6-8 तासांमध्ये मिळणेदेखील शक्य आहे.