मुंबई : आपल्या देशात तोंडाच्या कर्करोगाचे रुग्ण सर्वाधिक आहेत. परंतु जर तुम्हाला असे वाटत असेल की, केवळ तंबाखू खाणाऱ्यांनाच तोंडाचा कर्करोग होतो, तर तसे नाही. तोंडाचा कर्करोग कोणालाही होऊ शकतो आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणे.


हे लक्ष्णे दिसल्यास सावधगिरी बळगा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तोंडाचा कर्करोग झाल्यानंतर तोंडात गालाच्या आतल्या बाजूला फोड येते, ज्याला आपण तोंड येणे असे देखील म्हणतो. त्याचबरोबर तोंडात इजा होणे, ओठ फाटणे आणि जखम सहजसाहजी न भरणे अशी सामान्य लक्षणे दिसतात.


कर्करोगाची सुरवात तोंडाच्या आतल्या बाजूला सफेद फोड येण्यापासून होते.  जर तोंडात बराच काळ पांढरा दाग, जखम, तोंड आलं असेल, तर तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता आहे.


त्याचबरोबर तोंडातून दुर्गंध येणे, आवाज बदलणे, आवाज बसणे, काही गिळण्यात त्रास होणे, जास्त लाळ किंवा रक्त येणे, ही देखील तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. यामध्ये जखमा, सूज, रक्तस्त्राव, जळजळ, तोंडात दुखणे अशी लक्षणे दिसतात.


या लोकांना अधिक धोका असतो


धूम्रपान करणाऱ्या किंवा अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या लोकांना कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. तोंडाचा कर्करोग तोंडाच्या आत जीभ, हिरड्या, ओठ कुठेही होऊ शकतो. सामान्यतः तोंडाचा कर्करोग कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे होतो. याशिवाय तोंड व्यवस्थित साफ न केल्यामुळे दीर्घकाळात तोंडाच्या आजारांमुळे कर्करोगही होऊ शकतो.


जे तंबाखू किंवा त्याच्याशी संबंधित गोष्टी खातात, त्यांना कर्करोगाचा सर्वाधिक धोका आहे. बिडी, सिगारेट, अल्कोहोल यासारख्या गोष्टींच्या सेवनाने तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.


या गोष्टींची काळजी घ्या


- जर तोंडावर, ओठांवर किंवा जिभेवर काही जखम किंवा फोड आला असेल, तर ताबडतोब डॉक्टरांना दाखवा. जर पहिल्या टप्प्यात कर्करोगाचा शोध लागला तर त्याचे उपचार शक्य आहेत. याशिवाय कोणतीही लक्षणे नसली तरीही या गोष्टींकडे लक्ष द्या.


- त्याचबरोबर धूम्रपान आणि मद्यपान करू नका.


- दात आणि तोंड नियमितपणे दोनदा स्वच्छ करा. जर काही बदल दिसला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.


- जंक फूड, प्रोसेस्ड फूड, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेजिंग फूड खाऊ नका.