मुंबई : कोरोना व्हायरसमुळे डॉक्टरांकडून अनेकांना इम्युनिटी सिस्टम अर्थात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचा, ती मजबूत करण्याचा सल्ला देण्यात येतो. इम्युनिटी कमजोर असणाऱ्यांना कोरोनाचा धोका वाढू शकतो. इम्युनिटी आपल्या शरीरातील टॉक्सिन्सशी लढण्यात मदत करते. चांगली इम्युनिटी, केवळ सर्दी, खोकल्यापासूनच वाचवत नाही, तर हेपेटायटिस, लंग इन्फेक्शन, किडनी इन्फेक्शनसह अनेक रोगांपासून बचाव करण्यास मदत करते. इम्युनिटी कमजोर असण्याची अनेक कारणं असू शकतात. आधीपासूनच असलेला एखादा आजार किंवा धुम्रपान, मद्यपानाची सवय, झोप पूर्ण न होणं, खाण्या-पिण्याची अयोग्य सवयही इम्युनिटी कमजोर करु शकते. अंकुर चक्रवर्ती यांनी शरीरात इम्युनिटी कमजोर असल्याची काही लक्षणं सांगितली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सतत थकवा जाणवणं -


झोप पूर्ण न होणं, तणाव  (Tension), एनिमिया (Anemia)अशी काही सतत थकवा जाणवणं, सुस्ती असण्याची कारणं असू शकतात. जर याची कारणं माहित नसल्यास किंवा झोप पूर्ण होऊनही थकवा जाणवत असल्यास हे इम्युनिटी कमजोर असल्याचं लक्षण असू शकतं.


सतत संसर्ग होणं -


सतत आजारी पडणं, सतत सर्दी-खोकलाचा त्रास होणं, ताप येणं, घसा खराब होणं किंवा शरीरावर पुरळ-रॅशेस येणं अशा समस्या असल्यास, इम्युनिटी कमजोर असल्याची शक्यता असू शकते.


जखम लवकर बरी न होणं -


जखम झाल्यास ती लवकर बरी होत नसेल, तर रोगप्रतिकारशक्ती कमी असणं हे यामागील कारण ठरु शकतं.


व्हिटॅमिन डीची कमी -


व्हिटॅमिन डी (Vitamin-D)इम्युनिटी वाढवण्याचं काम करतं. अनेकांमध्ये याची मोठी कमतरता असते. व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास ती भरुन काढण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त, सतत थकवा, सुस्ती, निद्रानाश, नैराश्य आणि डार्क सर्कल्सदेखील कमकुवत प्रतिकारशक्तीची लक्षणं आहेत.


पचन समस्या -


आतड्यांमध्ये असणारे बॅक्टेरिया थेट इम्युन सिस्टमवर परिणाम करतात. जर सतत अतिसार, अल्सर, गॅस होणं, सूज येणं किंवा बद्धकोष्ठता असल्यास, हे इम्युन सिस्टम योग्यरित्या काम करत नसल्याचे संकेत ठरु शकतात.