Covid-19: कोरोना रूग्णांच्या चेहऱ्यावर दिसतायत `या` समस्येची लक्षणं
देशभरातील कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येतोय.
मुंबई : देशभरातील कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येतोय. कोविड लसीसंदर्भात अनेक गैरसमज लोकांच्या मनात होते. तर पुन्हा लसीबाबत आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. कोरोना झाल्यानंतर आणि कोविड लस घेतल्यानंतर, बेल पाल्सी म्हणजेच फेशियल पॅरालिसिस (चेहऱ्याचा पक्षाघात) झाल्याची लक्षणं लोकांमध्ये आढळली आहेत.
नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, कोविड लसीचा एक दुर्मिळ दुष्परिणाम म्हणून बेलच्या पाल्सीची नोंद करण्यात आली आहे. कोरोना संक्रमणाने ग्रस्त अशा लोकांमध्ये हा दुष्परिणाम अधिक सामान्य आहे.
युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्स क्लिव्हलँड मेडिकल सेंटर आणि केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांना असं आढळले की, कोरोना व्हायरस असलेल्या लोकांना कोरोनापासून संरक्षण देण्यासाठी लस देण्यात आली होती. त्यांच्या तुलनेत कोरोना झालेल्या लोकांमध्ये फेशियल पॅरालिसिसची शक्यता 7 पटीने जास्त आहे.
लस घेणाऱ्या 37,000 पैकी फक्त 8 बेल पाल्सीची प्रकरणं आढळली आहेत. म्हणजेच प्रत्येक 1 लाख लस घेणाऱ्यांमध्ये 19 केसेस अशा आहेत. बेलची पाल्सीची स्थिती ही रुग्णाच्या चेहऱ्यावर दिसून येते. यामध्ये, स्नायू कमकुवत होतात.
बेल पाल्सीच्या स्थितीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की, हे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीच्या अधिक प्रतिक्रियेमुळे होतं. यामुळे चेहऱ्यावर सूज येते. परिणामी चेहऱ्यावरील हालचाली नियंत्रित करणार्या मज्जातंतूंना नुकसान होतं.
एकूण 348,000 रूग्णांपैकी डॉक्टरांनी कोविड रूग्णांमध्ये 284 बेलच्या पाल्सीच्या प्रकरणांची नोंद केली आहे. यावरून असं म्हणता येईल की, कोविड रूग्णांमध्ये बेलच्या पॅल्सीचा धोका 0.08% आहे. या 284 रुग्णांपैकी अर्ध्याहून काही जास्त (54%) रूग्णांना कोरोना होण्यापूर्वी बेल्स पाल्सी होण्याचा धोका नव्हता.
कोविड रूग्ण आणि लस घेणाऱ्यांमध्ये बेल पाल्सीच्या जोखमीची तुलना करण्यासाठी, 64,00 लस न घेतलेल्या कोविड रूग्णांची लस घेणाऱ्या व्यक्तींशी तुलना केली. यावरून असे दिसून आले की, कोव्हिड रुग्णांना लस घेणाऱ्यांच्या तुलनेत बेल पाल्सी होण्याची शक्यता 6.8 पट जास्त होती.
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोविड किंवा कोविडच्या लसीमुळे बेल पाल्सी कसा होऊ शकतो हे अद्याप स्पष्टपणे सांगता येत नाही. हे निर्धारित करण्यासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे.