मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कन्सर झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली. सोनालीला हायग्रेड कन्सर असून तो आता चौथ्या स्टेजला आहे. पण कॅन्सर चौथ्या स्टेजला पोहचेपर्यंत याचा थांगपत्ता काही लागला नाही. शरीराच्या या ८ लक्षणांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. कारण यामुळे कॅन्सरला बळी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरीराच्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.


थकल्यासारखे वाटणे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थकवा जाणवण्याची अनेक कारणे असू शकतात. पण ल्यूकोमिया, कोलोन आणि पोटाचा कॅन्सर हे याचा पहिला संकेत आहे थकल्यासारखे वाटणे. तुम्हालाही नेहमी थकल्यासारखे वाटत असेल तर आराम करुनही तुम्हाला फ्रेश वाटत नसेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.


कफ


स्मोकिंग करणाऱ्या लोकांना कफासोबत रक्तही पडत असेल तर हा कॅन्सरचा संकेत असू शकतो. 


पोट फुगणे


अचुकीच्या खाण्याच्या सवयी किंवा स्ट्रेस यामुळे पोट फुगल्यासारखे वाटणे वेगळी गोष्ट आहे. पण सुस्ती, वजन कमी होणे आणि पाठदुखी यासोबत पोटही फुगल्यासारखे वाटत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. महिलांमध्ये सातत्याने होणारे ब्लॉटिंग ओव्हेरियन कॅन्सरचा संकेत असू शकते.


शौचातून रक्त पडणे


शौचातून रक्त पडत असल्यास ताबडतोब डॉक्टरांची भेट घ्या. याची अनेक कारणे असली तर हा कोलोन कॅन्सरचा संकेतही असू शकतो.


लघवी करताना त्रास होणे


वाढत्या वयानुसार लघवी येणे, लीक होणे हे त्रास प्रोस्ट्रेट कॅन्सर वाढल्यानेही होऊ शकतो. तर अनेकदा हा त्रास प्रोस्ट्रेट कॅन्सरलाही कारणीभूत ठरतो. यासाठी डॉक्टर स्पेशल ब्लड टेस्ट करतात त्यास PSA असे म्हणतात.


खूप काळापासून असणारा सर्दी खोकला


सर्दी-खोकला होणे ही सामान्य बाब आहे. पण जर हा त्रास खूप काळ ठीक होत नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. हा गळ्याचा कॅन्सरचा संकेत असू शकतो.


त्वचेवर स्पॉट्स येणे


त्वचेवर स्पॉट्स येणे, त्वचेचा रंग बदलणे हा स्किने कॅन्सरचा संकेत असू शकतो. शरीरावर जर कोणतेही निशाण दिसत असेल तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.