ही `६` लक्षणे देतात डोळे थकल्याचे संकेत!
स्क्रीनकडे बघताना डोळे जड होतात, त्यातून पाणी येते, डोळे दुखतात.
मुंबई : स्क्रीनकडे बघताना डोळे जड होतात, त्यातून पाणी येते, डोळे दुखतात. या समस्येकडे दुर्लक्ष न करता चांगल्या डॉक्टरांकडून डोळे तपासून घेणे गरजेचे आहे. कारण हा डोळे थकल्याचा संकेत आहे. ही आहेत डोळे थकण्याची (eye fatigue) काही लक्षणे...
डोळे लाल होणे, चुरचुरणे:
जर तुम्ही जास्त वेळ कॉम्पुटरवर काम करत असाल तर त्यामुळे डोळे कोरडे होतात. असे सातत्याने होत राहिल्यास डोळे लाल होणे, चुरचुरणे ही समस्या उद्भवते.
एकटक बघणे कठीण होते:
डोळे थकल्यानंतर ते बंद व्हायला लागतात. त्यामुळे एका ठिकाणी बघणे कठीण होते.
डोळे कोरडे होणे किंवा डोळ्यातून पाणी येणे:
ही समस्या तुम्हाला वारंवार जाणवत असेल तर हा डोळे थकल्याचा संकेत आहे. अशावेळी आय ड्रॉप वापरण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य राहील. कारण त्यामुळे डोळे थकण्याचे नेमके कारण कळेल.
अंधुक किंवा डबल दिसणे:
डोळे खूप थकल्यास एका ठिकाणी बघणे कठीण होते. त्याचबरोबर अंधुक किंवा डबल दिसू लागते. परंतु, हे तात्पुरते असले तरी त्यामुळे डोळ्यांवर अधिक ताण येतो.
लाईट सेन्सिटिव्हिटी वाढते:
डोळे थकल्यावर ते जड होतात व बंद होऊ लागतात. यामुळे नंतर लाईट सेन्सिटिव्हिटीची समस्या उद्भवते. त्यामुळे डोळे लाल होतात, दुखू लागतात. यासाठी ophthalmologist सल्ला घेणे गरजेचे आहे.
डोळे दुखतात:
डोळ्यांवर अधिक ताण आल्यास आणि त्याचबरोबर पुरेशी झोप न मिळाल्यास डोळ्यांची जळजळ होते. यामुळे डोळेच नाही तर मान, खांदे, पाठ दुखू लागते.