मुंबई : आपल्या मुलांचे होणारे लैंगिक शोषण हे पालकांसाठी अतिशय धक्कादायक असते. आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी आपण शक्य तितकी काळजी घेतो, तरीही अशा भयानक घटना घडतात. अशा वेळी काय करावे ते समजत नाही. काही वेळा अशा घटना फार उशिरा लक्षात येतात. याची काही लक्षणे वेळीच जाणून घ्या. त्यामुळे अशा घटनांची जाणीव वेळीच होवून त्यावर तुम्हाला पाऊल उचलता येईल.


Bruises:


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लैंगिक शोषणाचे सगळ्यात महत्त्वाचे लक्षण म्हणजे शरीरावर विशेषतः हातावर bruises दिसू लागतात. असे साधारणपणे मुलं खेळताना किंवा उड्या मारताना देखील होते. परंतु, असे किती वेळा होते याकडे नीट लक्ष द्या. 
गुप्तांगात किंवा छातीवर सूज येणे: गुप्तांगात किंवा छातीवर सूज येणे हे लैंगिक शोषणाचे अजून एक लक्षण आहे. तसंच तो भाग लालसर दिसत असल्यास त्याकडे गंभीरपणे बघण्याची गरज आहे. त्याचबरोबर शरीरावर इतर ठिकाणी काही ओरखडे दिसत आहेत का, याकडे बारकाईने लक्ष द्या. 


चालताना किंवा बसताना त्रास होणे:


जर तुमच्या मुला/ मुलीला चालताना किंवा बसताना त्रास होत असेल तर ती/तो लैंगिक शोषणाचे बळी आहेत, हे ओळखा. यासाठी लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. 


जर मुलं शांत बसत असेल किंवा काहीतरी लपवत असेल:


जर तुमचे मुलं शांत बसत असेल किंवा तुमच्या पासून काहीतरी लपवत असेल तर हा लैंगिक शोषणाचा संकेत आहे. जर शाळेतील किंवा दिवसभरातील घटना सांगताना तिला/ त्याला कम्फरटेबल वाटत नसेल तर ही बाब गंभीर आहे. आणि त्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. 


अचानक चिडचिड करणे:


जर तुमचे मुलं अचानक चिडचिड करत असेल, अत्यंत घाबरलेलं दिसत असेल आणि सतत चिंतेत, काळजीत असेल तर नक्कीच काहीतरी चुकीचे घडले आहे. तसंच रात्री नीट झोपत नसेल किंवा अचानक दचकून उठत असेल तर तुम्हाला याकडे गंभीरपणे बघायला हवे. सगळ्यात आधी तिच्याशी/ त्याच्याशी शांतपणे, प्रेमाने बोलण्याची गरज आहे. गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.