अशी घ्या बाळाच्या सुरक्षित लसीकरणाची खबरदारी
५ वर्षापर्यंत हे लसीकरण नियमितपणे सुरूच असते.
मुंबई : वाढत्या प्रादुर्भावावर मत करण्यासाठी देशभरात लॉडाऊनचे पालन केले जात आहे. मात्र या संकटकाळी आपल्या बाळाला लसीकरण करणे सुरक्षित आहे की नाही अशा संभ्रमात अनेक पालक आहेत. मात्र, गरजेच्या लसी लांबणीवर न टाकता त्या वेळीच देणे आवश्यक आहे. त्यामुळे पालक आणि रुग्णालयांनी योग्य ती खबदारी घेत लसीकरण सुरूच ठेवणे आवश्यक असल्याचे खारघरच्या मदरहुड रुग्णालयाचे बालरोग व नवजात विज्ञानचे डॉ. सुरेश बिराजदार यांनी सांगितले. जन्मानंतर काहीच तासांनी बाळाला लस देण्यास सुरवात होते. ५ वर्षापर्यंत हे लसीकरण नियमितपणे सुरूच असते.
बाळाच्या जन्मानंतर त्याला बीसीजीची लस देतात. दम्यापासून बाळाचा बचाव त्यामुळे होतो. त्यानंतर 3 ते 6 महिन्याच्या वयात बाळाला देवी, पोलिओ इत्यादी रोगांपासून बचाव करण्यासाठी लस देण्यात येते. या लशी बाळासाठी फारच महत्त्वाच्या असतात.
करोना साथीच्या काळात बरचसे पालक सध्या संभ्रमात आहेत. या काळात लसीकरण करावे की नाही, कोणत्या लसी द्याव्यात? लसीकरण सुरक्षित आहे का? अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत. सध्याच्या काळात लसीकरण गरजेचे नाही, नंतर दिले तर चालेल, असेही काही डॉक्टर सांगत आहेत. परंतु हे सर्व चुकीचे आहे. लसीकरण सुरू राहणे अत्यंत म्हत्वाचे आहे. इबोलाच्या साथीनंतर गोवर, मलेरिया, टी. बी. ने सर्वांत जास्त मृत्यू झाले होते, हे विसरून चालणार नाही. पुढील काळातील गोवर, पिवळा ताप, पोलिओ, मेंदूज्वर, न्युमोनिया, गॅस्ट्रो, अशा आजारांमुळे होणारे मृत्यू वाचवायचे असतील तर लसीकरण सुरू ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. संसर्गजन्य आजारांचा धोका ओळखून किमान पहिल्या दीड वर्षांतील सर्व प्राथमिक लसी वेळेवर घेणे इष्ट राहील, असे भारतीय बालरोगतज्ञ संघटनेने कळवले आहे.
लसीकरणावेळी ही खबरदारी घ्या
लसीकरणाच्या वेळी दवाखान्यात जंतुसंसर्ग टाळण्यासाठी खूप काळजी घेतली जावी. डॉक्टर; तसेच स्टाफने सर्जिकल मास्क आणि ग्लोव्हज घालणे आवश्यक आहे. काही लसी एकत्र; तसेच एकाच दिवशी देता येऊ शकतात. त्याही द्याव्यात.
-लसीकरणाचे व आजाराचे पेशंट शक्यतो वेगवेगळ्या वेळेस आधी वेळ ठरवून बोलवावे
-लसीकरणाला आलेल्या बाळाला ताप व सर्दी खोकला नाही ना याची खात्री करावी
-आजी, आजोबांनी लसीकरणाला येणे टाळावे
-बाळाबरोबर एकाच व्यक्तीने डॉक्टरांच्या केबिनमध्ये जावे
-बाळ, पालक, डॉक्टर सर्वांनी मास्क घातलाच पाहिजे
-पूर्व नियोजित वेळेनुसार लसी घ्याव्यात
-डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन द्यावे