Tamarind Leaves Hair Treatment: वातावरण बदलाचे निसर्गावर विविध परिणाम पाहायला मिळतात. याच वातावरण बदलाचे आपल्या शरीरावर देखील परिणाम, दुष्परिणाम होत असतात. अशात आपल्या शरीरावर होणारे हे परिणाम हे आपण घेत असलेला आहार आणि शरीरातील हार्मोन्सवर अवलंबून असतात. असं म्हणतात लहानपणी केलेली तेल मालिश त्वचेतील पेशी मजबूत करतात. ज्यामुळे आपल्या त्वचेवर एक प्रकारची चमक पाहायला मिळते. अशाच प्रकारे केसांचीही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. केसांची काळजी न घेतल्यास हेअर फॉल, सफेद केस अशा समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात चिंचेच्या पानांचा वापर करून तुम्ही केसाच्या समस्यांपासून कसा बचाव करू शकतात.  


आवळा आणि चिंचेची पानं 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आवळा ( aamla ) आणि चिंचेच्या ( tamarind leaves)  पानांचा वापर केसांसाठी उपयुक्त असतो. यासाठी तुम्हाला ताजे आवळे, चिंचेची काही पानं लागतील. यानंतर तुम्हाला ताज्या आवळ्यांचे तुकडे करून चिंचेची पानं आणि आवळ्याची एकत्रित पेस्ट तयार करावी लागेल. याचा वापर आंघोळीआधी केसांववर केल्यास तुमची सफेद केसांची समस्या दूर होऊ शकते. 


चिंचेची पानं आणि दही 


दही ( Yogurt ) आणि चिंचेच्या पानांपासून तुम्ही तुमच्या केसांसाठी हेअर पॅक तयार कर शकतात. यामुळेही तुमची सफेद केसांची समस्या दूर होऊ शकते. काही चिंचेची पानं आणि दही एकत्रित करून त्यांची पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या केसांवर एक तासभर लावून ठेवल्यास तुमची सफेद केसांची समस्या दूर होऊ शकते. तुम्हाला चांगले रिझल्ट्स दिसायला लागतील.  


चिंचेची पानं आणि मेथीचे दाणे 


मेथीचे ( fenugreek seeds) दाणे आणि चिंचेची पानं देखील केसांसाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात. यासाठी तुम्हाला रात्रभर मेथीचे दाणे भिजत घालावे लागतील. सकाळी भिजत घातलेले मेथी दाणे आणि पाणी वेगळं करायचं आहे. यानंतर भिजत ठेवलेले मेथीचे दाणे आणि चिंचेची पानं एकत्रित करून त्याची पेस्ट तयार करावी. 


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)


Tamarind Leaves Hair Treatment for unbelivable results full process