कोक्लेयर इम्प्लांट प्रणालीमुळे ऐकणं झालं सोपं
श्रवणशक्ती शक्ती कमी झालेल्या मुलांसाठी आणि प्रौठांसाठी कोक्लेयर इम्प्लांट प्रणाली योग्य मार्ग आहे.
मुंबई : समोरच्या व्यक्तीचे बोलणे ऐकू येत नसेल किंवा तुम्ही त्या व्यक्तीला पुन्हा बोलोयला लावत असाल, त्याचे बोलणे चोख समजून घेण्याचा प्रयत्न करत असाल तरी देखील तुम्हाला स्पष्ट एकू येत नसेल तर कोक्लेयर इम्प्लांट प्रणालीच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्ट ऐकू येवू शकतं. श्रवणशक्ती शक्ती कमी झालेल्या मुलांसाठी आणि प्रौढांसाठी कोक्लेयर इम्प्लांट प्रणाली योग्य मार्ग आहे.
आपल्या कानाच्या आतील बाजूस कोचलीया नामक केसांच्या लहान पेशी असतात. या पेशी सामान्यत: बाहेरून येणारे ध्वनी स्पंदने उचलतात आणि श्रवण मज्जातंतूंद्वारे मेंदूत पाठवतात. त्यामुळे कमी ऐकू येणाऱ्या लोकांना आवाज स्पष्ट ऐकू येण्यास मदत होते.
कोक्लेयर इम्प्लांट हे एक लहान आणि जटिल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. एका विशिष्ट प्रकारच्या शस्त्रक्रियेनंतर ऐकण्याची क्षमता वाढते. परंतु या प्रक्रियेसाठी कालावधीची गरज असते. देशभरात सुमारे २०० अत्याधुनिक इम्प्लांट सेंटर आहेत.
कोक्लेयर इम्प्लांट ग्रुप ऑफ इंडियाने यशस्वीरित्या कोक्लेयर इम्प्लांटेशनसंदर्भात जागरूकता निर्माण केली. डॉ. डिल्लोन डिसोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात आतापर्यंत ३० हजार प्रत्यारोपण करण्यात आले आहे. दरवर्षी ५०० रोपण आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री निधीसाठी पुरविल्या जाणाऱ्या एडीआयपी योजनेद्वारे सहाय्य करून कर्णबधीर लोकांची मदत केली जाते.