मुंबई : लस घेण्याबरोबरच कोरोना नियमांचं पालन करण्याव्यतिरिक्त, संक्रमणाचा धोका कमी होऊ शकतो. कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही, बरेच लोक व्हायरसच्या संपर्कात येत आहेत. लसीकरण केवळ तीव्रतेचा धोका कमी करण्यासाठी प्रभावी आहे. तज्ज्ञ सांगतात की, लसीकरण पूर्ण संरक्षण देत नाही आणि तुम्ही सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं तसेच इतर सर्व नियमांचे पालन करणं आवश्यक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (सीडीसी) अलीकडील सूचनांनुसार, जे लोक इम्यूनोसप्रेसेन्ट्स घेतात त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क घालणं आवश्यक आहे.


या कारणांमुळे लोकांनी असलं पाहिजे सावधान


अनेक देशांमध्ये लसीकरण मोहीम खूप वेगाने सुरू आहे. परंतु हे लक्षात ठेवलं पाहिजे की, कोणतीही लस कोरोना विषाणूपासून पूर्ण संरक्षण देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत प्रत्येकाला संसर्ग होण्याचा धोका असतो. परंतु नियमितपणे औषधाच्या सेवनाने किंवा एखाद्या व्यक्तीच्या आजारांमुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यास संसर्गाचा धोका जास्त असतो. 


का गरजेचं आहे लसीकरण


लसीकरण आपल्याला रोग प्रतिकारशक्ती देतं. परंतु त्याची लक्षणं व्यक्तीनुसार बदलतात. लसीकरण केवळ काही प्रमाणात व्हायरसपासून आपलं संरक्षण करतं. जामामध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, लसीच्या पहिल्या डोसनंतर अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्तींमध्ये 17% कोविड अँटीबॉडीज तयार होतात.


इम्यूनोसप्रेसेन्ट औषधं घेणाऱ्या लोकांसाठी मास्क आवश्यक


इम्युनोसप्रेसंट औषधं ही औषधांचा एक वेगळा वर्ग आहे. यकृत, हृदय किंवा किडनी यांसारखे अवयव प्रत्यारोपणानंतर यापैकी काही औषधं दिली जातात. जेणेकरून शरीराने प्रत्यारोपित केलेला अवयव नाकारण्याची शक्यता कमी होते. ल्यूपस, सोरायसिस आणि संधिवात यासारख्या विकारांवर उपचार करण्यासाठी इतर प्रकारची इम्यून संदर्भातील औषधं वापरली जातात. त्यामुळे या आजारांनी ग्रस्त लोकांनी घराबाहेर पडताना मास्क घालावं.