जाणून घ्या आठवड्यातून कधी आणि किती वेळा केस धुवावेत?
हा प्रश्न असा आहे की ज्याचे उत्तर लोकांनी गुगलवरुन शोधण्याचा बराच प्रयत्न केलाय.
मुंबई : हा प्रश्न असा आहे की ज्याचे उत्तर लोकांनी गुगलवरुन शोधण्याचा बराच प्रयत्न केलाय. अनेकदा लोक आठवड्यातून दोनवेळा केस धुतात. काहींना तर दररोज केस धुण्याची सवय असते. तर काहीजण केसांना दररोज कंडिशनिंगही करतात. खरतरं केस कधी आणि किती वेळा धुवावेत असा काही नियम नाहीये मात्र केसांना योग्यपद्धतीने धुतल्यास केस बराच काळ चांगले आणि स्वस्थ राहतात.
उन्हाळ्यात घ्या केसांची विशेष काळजी
तुमचे केस दाट आणि कुरळे असतील तर केस नियमितपणे धुवावेत. असे न केल्यास केस रुक्ष होतात. तुमचे केस कसे आहेत यावर ते किती वेळा धुवावेत हे अवलंबून आहे. तुमचे केस कुरळे असतील तर दररोज धुण्याची गरज नाही. जर तुमचे केस तेलकट असतील तर आठवड्यातून दोन वेळा केस धुण्याची गरज आहे. दररोज केस धुतल्यास ते रुक्ष आणि निर्जीव होऊ शकतात. केस दररोज धुतल्याने केसांच्या त्वचेवर ड्रायनेस येतो. केस तेलकट असल्यास ड्राय शाम्पूचा वापर करा. केस योग्य पद्धतीने आणि वेळेत धुतल्यास केसांची चमक आणि आरोग्य चांगले राहते.