Heart Surgery, नवी दिल्ली : हृदयविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हृदयविकाराशी संबधीत शस्त्रक्रिया(Heart Surgery,) अत्यंत महागड्या असतात. यामुळे आर्थिकदृष्या दुर्बल असलेल्या रुग्णांना उपचाराच खर्च झेपत नाही. परिणामी अनेक रुग्णांना उपचार करुन घेणे शक्. होत नाही. मात्र, आता हार्ट ऑपरेशन स्वस्त होणार आहे.  हार्ट ऑपरेशनसाठी लागणा-या स्टेंटच्या किंमती लवकरच कमी होणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून(Union Ministry of Health) जीवनावश्यक औषधांच्या यादीत स्टेंटचा समावेश केला आहे. स्टेंटच्या किंमती कमी झाल्यामुळे शस्त्रक्रियेचा खर्च कमी होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हृदयविकार रुग्णांसाठी जीवरक्षक ठरणा-या स्टेंटच्या किंमती लवकरच कमी होणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जीवनावश्यक औषधांच्या यादीत स्टेंटचा समावेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.  हृदयविकाराशी संबधीत शस्त्रक्रियांमध्ये आवश्यक असलेल्या या स्टेंटबाबात केंद्र सरकारनं हा मोठा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.


त्यामुळं हार्ट ऑपरेशनमध्ये वापरलं जाणार स्टेंट स्वस्त होणार आहे. भारतीय कायद्यानुसार स्टेंट हे औषध-नियंत्रण कायद्याच्या कक्षेत येते. ते जीवरक्षक असल्याने त्याचा समावेश आवश्यक औषधांच्या यादीत करून त्यांच्या किमतींवर नियंत्रण आणावे, अशी मागणी आरोग्य खात्याकडून करण्यात येत  होती. 


आरोग्य मंत्रालयाने अखेर स्टेंबबाबत धोरणात्मक निर्णय घेत हृदयविकार रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारच्या निर्णयानंतर आता स्टेंटच्या नव्या किंमती लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.