मुंबई : लस उत्पादक कंपनी भारत बायोटेकच्या चिकुनगुनिया लसीच्या क्लिनिकल ट्रायलच्या प्रारंभिक टप्प्याला सुरुवात करण्यात आली आहे. कोस्टारिकामध्ये याला सुरुवात झाली असून सहभागीला लस देण्यात आली आहे. इंटरनॅशनल वॅक्सीन इंस्टिट्यूटने (IVI) याबाबतची घोषणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयवीआयने सांगितलं की,  ही चाचणी त्यांच्या नेतृत्वात आणि भारत बायोटेक यांच्यासह झालेल्या भागीदारीत या अभ्यासाची सुरुवात झाली आहे. 


भारत बायोटेक इंटरनेशनल लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एल्ला यांनी सांगितलं आहे की, "महामारीची तयारी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सेवेतील एक महत्त्वाची पायरी आहे. भारत बायोटेकची लस मोठ्या संशोधनानंतर विकसित करण्यात आली आहे.  या अभ्यासात सहभागी झाल्याबद्दल आम्ही कोस्टारिकाच्या पहिल्या स्वयंसेवकाचं आभार मानतो. आयव्हीआयच्या नेतृत्वाखालील मानवी चाचणीने सुरक्षा आणि प्रतिकारशक्तीचे मूल्यमापन करण्यासाठी एक महत्त्वाचा चाचणी टप्पा सुरू केला आहे."


ही घोषणा भविष्यात येणाऱ्या महामारींना तोंड देण्यासाठी मार्च 2021मध्ये सुरु करण्यात आलेल्या सीईपीआईच्या 3.5 अरब अमेरिकी डॉलरच्या योजनेला पुढे नेतं. ज्यामध्ये चिकनगुनियासह विविध रोगांसाठी लसी विकसित करणंही समाविष्ट आहे.


सीईपीआईने पहिल्यांदा जून 2020मध्ये आयवीआय आणि भारत बायोटेकसोबत भागीदारी आणि लसीच्या विकासाला 1.41 करोड यूएस डॉलरची रक्कम प्रदान केली.