मुंबई : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. देशात लसीकरणासंदर्भात रेकॉर्ड केले जात आहेत. मात्र अशा परिस्थितीत लसीकरणाशी संबंधित विविविध बातम्या समोर आली आहे. अशीच एक धक्कादायक बातमी यूपीच्या बलरामपूरमधून समोर आली आहे. यामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीला कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बलरामपूरमधून एका महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. या मृत महिलेला लसीचा दुसरा डोस देण्यात आला. एवढंच नाही तर महिलेच्या पूर्ण लसीकरणाचं प्रमाणपत्रही देण्यात आले. ही बाब उघडकीस आल्यावर आरोग्य विभागाच्या पथकाने त्याला मानवी चूक असल्याचं सांगितलं आहे.


मृत्यूच्या दोन महिन्यांनंतर लगावली लस


एका बातमीनुसार, हे प्रकरण बलरामपूरच्या उतरौला भागातील आहे. ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र बध्या पकडीच्या टीमने हे काम केलं आहे. 14 एप्रिल 2021 रोजी या केंद्रात, राजपती नावाच्या 81 वर्षीय महिलेला कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला. दुसऱ्या डोससाठी 84 दिवसांचा वेळ देण्यात आला होता. या दरम्यान 4 जून रोजी अचानक महिलेचा मृत्यू झाला. परंतु 28 ऑगस्ट रोजी, त्याच्या मृत्यूनंतर दोन महिन्यांनी, कागदावर दुसरा डोस लावला असल्याचं लिहिलं, ज्याचं लसीकरण प्रमाणपत्र देखील देण्यात आलं.


सर्टिफिकेट सोशल मीडियावर व्हायरल


जेव्हा मृत महिलेच्या कुटुंबीयांना या प्रकरणाची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी लसीकरणाचं प्रमाणपत्र डाउनलोड केलं आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केलं. महिलेच्या कुटुंबातील दीपक वर्मा यांनी लसीकरणाचं प्रमाणपत्र फेसबुकवर शेअर केलं आणि ते व्हायरल झालं.


एसीएमओ अरुण वर्मा यांना ही माहिती मिळताच मृत महिलेच्या घरी पोहचून प्रकरणाचा तपास सुरू करण्याचे आदेश दिलेत. मृत महिलेच्या लसीकरणाच्या प्रश्नावर एसीएमओ म्हणाले की, ही मानवी चूक आहे. खरं तर, मृत महिलेचं लसीकरण केंद्रात केलं गेलं होतं. त्याच दिवशी दुसरा डोस तिच्या एका नातेवाईकाला दिला गेला. ऑपरेटरच्या चुकीमुळे त्याच ही गोष्ट घडली. यामुळे त्याचे लसीकरण प्रमाणपत्र देण्यात आले.