मुंबई : डँड्रफच्या समस्येने अनेकजण त्रस्त आहेत. खासकरून पावसाळ्याच्या दिवसांत या तक्रारीला अधिक सामोरं जावं लागतं. अनेक प्रयत्नांनी किंवा शँपूने देखील डँड्रफपासून तात्पुरती मुक्ती मिळते. मात्र थोड्या दिवसांत पु्न्हा डँड्रफची समस्या उद्भवते. मात्र आज आम्ही तुम्हाला डँड्रफ घालवण्याचे काही घरगुती उपाय सांगणार आहोत. 


डँड्रफ होण्यामागचं कारण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोषण तत्त्वांच्या अभावामुळे किंवा रक्त प्रवाह कमी झाल्यामुळे डोक्याची त्वचा कोरडी होऊ लागते. यामुळे कोंडा म्हणजेच डँड्रफ होण्यास सुरवात होते. केस व्यवस्थित न धुणं, केस न विंचरणं, तणाव, त्वचेच्या विविध एलर्जी या गोष्टीही डोक्यात कोंडा होण्याचे कारण असू शकतात. डोक्यातील कोंड्यामुळे केसगळतीचीही तक्रार अनेकांना जाणवते. परंतु काही घरगुती उपचारांचा नियमित वापराने डँड्रपासून मुक्तता मिळेल.


नारळाचं तेल


नारळ तेल टाळूला मॉइश्चराइझ करतं आणि आवश्यक ते पोषण देतं. हा घरगुती उपाय वापरण्यासाठी, टाळूवर हलक्या हातांनी तीन ते चार चमचे तेलाने मालिश करा. तेल लावल्यानंतर अर्धा तासानंतर सौम्य शॅम्पूने डोकं धुवा.


कोरफडाचा वापर


डँड्रफच्या समस्येने ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या स्कॅल्पला खाज सुटु लागते. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी कोरफड खूप प्रभावी ठरतं. जर तुम्हाला डोक्यातील कोंडासाठी कोरफड वापरायचा असेल तर, केस धुण्याआधी केसाच्या त्वचेवर कोरफडचा जेलने हळूवारपणे मसाज करा.


एप्पल सायडर व्हिनेगर


एप्पल सायडर व्हिनेगरमध्ये अँटी-फंगल प्रॉपर्टीज असतात. जे बुरशीमुळे होणारा डँड्रफ काढून टाकण्यास मदत करतं. हे स्कॅल्पच्या पीएच पातळीस संतुलित करण्यास देखील मदत करते. याटा वापर करण्यासाठी एप्पल सायडर व्हिनेगर एक चतुर्थांश कप पाण्यात मिसळा आणि नंतर टाळूवर लावा. कमीतकमी 15 मिनिटांनी सौम्य शॅम्पूने आपले केस धुवा.