अन्नामुळेच्या ऍलर्जी विविध मार्गांनी दिसून येऊ शकतात. तसेच ज्याबाबत कमी बोलले जाते. कारण या ऍलर्जीमुळे शरीरावर होतो जास्त त्रास जो पुरळ किंवा त्वचेच्या इतर समस्यांमधून उद्भवतो. या पुरळाचा सौम्य चट्ट्यापासून पित्ताच्या तीव्र गाठी किंवा एक्झेमा इतकाही असू शकतो. अशा शारीरिक त्रासामुळे हे समजून घेणे गरजेचे आहे की, कोणत्या आहारामुळे हा त्रास होतो. ऍलर्जी तसेच त्वचेवरील पुरळासाठी कारणीभूत ठरणारी पाच सर्वसामान्य खाद्यपदार्थ कोणते ते डॉ. आकाश शाह, सल्लागार पॅथॉलॉजिस्ट, न्यूबर्ग डायग्नॉस्टीक्स यांच्याकडून जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेलफिश: शेलफिशने ऍलर्जी होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे गाठी, एक्झेमा किंवा तीव्र प्रकरणांमध्ये अ‍ॅनाफायलॅक्सिस सारख्याही त्वचेच्या प्रतिक्रिया दिसून येऊ शकतात. यामध्ये कोळंबी, खेकडे, लॉब्स्टरसारखे क्रस्टेशियन्स तसेच शिंपले व ऑयस्टर्ससारखे मॉलक्स यामुळे ऍलर्जी होण्याची दाट शक्यता आहे. . केवळ शेलफिश खाण्यानेच होत नाही; तर फक्त शिजवण्याच्या वाफा नाकावाटे घेण्याने वा शेलफिशला स्पर्श केल्याने संवेदनशील वैयक्तिकांमध्ये अ‍ॅलर्जीयुक्त प्रतिक्रिया दिसून येऊ शकतात.


सुकामेवा: चणे, शेंगदाणे यांच्यासह नट्स, तसेच बदाम, अक्रोड, व काजू यांसारखे झाडावर उगवणारा सुकामेवा शरीरासाठी घातक आहे. हे ऍलर्जीयुक्त त्वचा प्रतिक्रियांसाठी त्रासकारक सिध्द आहेत. सुकामेव्यामुळे उद्भवणारी ऍलर्जी सौम्य खाज तसेच गाठींपासून तीव्र सूज व श्वास घेणे कठीण बनण्याइतका असू शकतो. नट ऑईल्स वा बटर्सच्या केवळ अगदी लावण्यानेच अ‍ॅलर्जी असणार्‍या वैयक्तिकांमध्ये त्वचेची जळजळ उद्भवू शकते.


डेअरी: डेअरी उत्पादने सामान्य अ‍ॅलरजेन असतात. मुलांमध्ये यामुळे ऍलर्जी होण्याची दाट शक्यता आहे. एक्झेमा किंवा गाठींसारख्या त्वचेवरील प्रतिक्रिया दूध, चीझ, योगर्ट, अथवा बटरसारखी डेअरी पदार्थ खाल्ल्यानंतर थोड्याच वेळानेच ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो. काही व्यक्तींना डेअरी उत्पादनांच्या थेट संपर्कात आल्याने देखील ऍलर्जीपूर्ण त्वचारोगांचाही अनुभव येऊ शकतो.


अंडी: अंडीदेखील आणखी एक सर्वसामान्य खाद्य अ‍ॅलर्जेन आहे, मुख्यत्वे याचा त्रास मुलांना सर्वात जास्त होते. अंडी किंवा अंडेयुक्त खाद्ये, जसे की बेक्ड सामुग्री, मेयोनिझ, किंवा विशिष्ट सॉसेस खाल्ल्यानंतर थोड्याच वेळाने गाठी किंवा एक्झेमासारख्या त्वचेच्या प्रतिक्रिया उद्भवू शकतात. अंड्याने अ‍ॅलर्जी वाढू शकते. मात्र काही मामल्यांमध्ये प्रौढतेतही टिकून राहू शकते.


सोया: सोयाबिनमुळे ऍलर्जी होते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. सोयाबिन खाल्ल्यामुळे अनेकदा त्वचेवर पुरळ, गाठी, किंव एक्झेमासारखे त्रास होऊ शकतात. सोया कित्येक प्रक्रियाकृत खाद्यांमध्ये आढळून येतो जसे की, सोया प्रोटीन, सोया लेसिटीलिन, अथवा सोयाबीन तेल. सोयाची अ‍ॅलर्जी असणार्‍या व्यक्तींनी खाद्यपदार्थांवरील लेबल्स काळजीपूर्वक नजरेखालून घालायला हवी तसेच सोया-आधारित उत्पादनांना कदाचित टाळायला हवे.


खाद्यपदार्थांनी कारणीभूत ऍलर्जी तीव्रतेत कमी जास्त असू शकतात तसेच काही व्यक्तींमध्ये सौम्य त्वचेच्या प्रतिक्रिया अनुभवाला येऊ शकतात तर काहींना प्राण घातक अ‍ॅनाफायलॅक्सिसना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्हाला एखादी खाद्यपदार्थाने कारणीभूत त्वचेवरील पुरळाची अ‍ॅलर्जी झाली असल्याचा संशय असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.