मुंबई : सध्या कामाच्या धकाधकीच्या जीवनात लोकं त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देताना दिसत नाहीत. हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे केवळ शारीरिक आरोग्य जपणं नाही तर त्यासोबत मानसिक आरोग्यही जपावं लागतं. पुरुषांनीही त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. निरोगी आरोग्य जपण्यासाठी आरोग्यविषयक चाचण्याही करणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर आज जाणून घेऊया पुरुषांनी कोणत्या 5 चाचण्या नियमित केल्या पाहिजेत. 


ब्लड प्रेशर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुरुषांनी हेल्दी राहण्यासाठी ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवणं फार गरजेचं आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या माहितीप्रमाणे, नॅचरल ब्लड प्रेशर लेवल 120-140 मिमीएचजी आणि 60-80 मिमीएचजी असते. जर तुम्हाला हृदयाचे आजार किंवा हाय ब्लड शुगर सारखी समस्या असेल तर ब्लड टेस्टही केली पाहिजे.


पोटाच्या कॅन्सरची तपासणी


पुरुषांमध्ये कॅन्सरने मृत्यू होण्याचं दुसरं कारण कोलोरेक्टर कॅन्सर आहे. चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये वाढ होतेय. कोलन कॅन्सरची सुरुवात अनेकदा कोणतंही लक्षणाविना होते. त्यामुळे याचं योग्यवेळी निदान होणं गरजेचं आहे. जेणेकरून यावर उपचार करणं सहज शक्य आहे. त्यासाठी कोलन कॅन्सरची तपासणी करून घेतली पाहिजे.


डिप्रेशन


पुरुष त्यांच्या जीवनात डिप्रेशनचे शिकार होऊ शकतात. डिप्रेशनसारख्या मानसिक आजाराच्या लक्षाणांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. तुमच्या बळावर डिप्रेशनवर मात करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला निराश वाटत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधून यासंबंधी तपासणी करून घ्यावी.


कोलेस्ट्रॉलची तपासणी


शरीरातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीचा आरोग्यावर परिणाम होतो. कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर त्यामुळे हृदयासंबंधीचे आजार, मधुमेह तसंच स्ट्रोक यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे एचडीएल (चांगलं कोलेस्ट्रॉल) आणि एलडीएल (वाईट कोलेस्ट्रॉल) यांची मात्रा तपासणं गरजेचं आहे. 


डायबेटीज तपासणी


डायबेटीजची तपासणी पुरुषांच्या आरोग्यासाठी फार महत्त्वपूर्ण असते. जर तुमचा बॉडी मास इंडेक्स 25 पेक्षा अधिक असेल आणि रक्तदाब 135/80 मिमी एचजीपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला डायबेटीजची चाचणी केली पाहिजे.