मुंबई : संपूर्ण जगात कोरोना प्रतिबंधक लस दिल्या जात आहेत. अजूनपर्यंत कोणत्याही देशात दोन किंवा तीन लसींपेक्षा अधिक लसी उपलब्ध नाहीत. मात्र अशी लस कोणती आहे जी कोरोना विरोधात अधिक शक्तीशाली आहे. दरम्यान याबाबत माहिती दिली आहे यूनिवर्सिटी ऑफ मैरीलँड यूसीएचच्या संक्रामक रोग विभागाचे प्रमुख डॉ. फहीम यूनुस यांनी.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. फहीम युनूस यांनी आपल्या ट्विटरवरून ही माहिती दिली की या वेळी कोरोनाविरूद्ध सर्वात चांगली सात लस कोणती आहे. यात त्यांनी सांगितलं आहे की ही लस शेवटच्या टप्प्यातील चाचणीनंतर संभाव्यता दर्शवते. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर याचा कमी परिणाम होऊ शकेल.


डॉ. फहीम युनूस यांच्या म्हणण्याप्रमाणे, कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटवर त्याची कार्यक्षमता कमी जास्त होऊ शकते. उदाहरणार्थ, ChAdOx1 nCoV-2019 म्हणजेच ऑक्सफोर्ड / अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसच्या दुसर्‍या डोसनंतर, 90% कार्यक्षमता प्राप्त होते. तर जॉन्सन आणि जॉन्सनची 72 टक्के.


डॉ. फहीम यांच्या ट्विटमध्ये नमूद केल्यानुसार, सर्वात कमी परिणाम होणारी लस म्हणजे चीनची कोरोनाव्हॅक. ही लस सातव्या क्रमांकावर आहे. ही लस चीनी औषध कंपनी सायनोवॅक यांनी बनवली आहे. कोरोना विरूद्ध त्याची कार्यक्षमता केवळ 50 टक्के आहे. यानंतर जॉन्सन आणि जॉन्सनची JNJ-78436735 लस असून तिची क्षमता 66 टक्के आहे. ही लस सहाव्या क्रमांकावर आहे.


यानंतर ऑक्सफोर्ड/अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस ChAdOx1 nCoV-2019 अर्थात भारतातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार केलेली कोविशिल्ड लस आहे. ही लस पाचव्या क्रमांकावर आहे. त्याची कार्यक्षमता 70 टक्के आहे, परंतु दोन्ही डोस घेतल्यानंतर ती 90 टक्के होते.


चौथ्या क्रमांकावर नोवावैक्स कंपनीची कोविड -19 लस NVX-CoV2373 आहे. कोरोना विरूद्ध त्याची कार्यक्षमता 89 टक्के आहे. तर, तिसर्‍या क्रमांकावर रशियाच्या गामालेया साइंटिफिक रिसर्च इंस्टीट्यूटने बनवलेली गैम-कोविड-वैक स्पुतनिक-व्ही आहे. कोविड 19 विरोधात त्याची कार्यक्षमता 92 टक्के आहे. दरम्यान स्पुतनिक-व्हीला भारतात परवानगी देण्यात आली आहे.


दुसर्‍या क्रमांकावर, मोडर्ना फार्मास्युटिकल कंपनीची mRNA-1273  लस आहे. कोरोना विरुद्ध लढण्याची या लसीची क्षमता कोणाची 94 टक्के आहे. तर पहिल्या क्रमांकावर फाइजर-बायोएनटेकची लस BNT162b2 आहे. जगात उपलब्ध असलेल्या कोरोना लसींपैकी या लसीची कार्यक्षमता सर्वाधिक म्हणजेच 95 टक्के आहे. मात्र विविध वेरिएंटवर याचा प्रभाव आणि क्षमता वेगळी असेल.