How to get rid of Cockroaches: आपण आपलं घर स्वच्छ ठेवण्यासाठी नाना तऱ्हेचे उपाय करतो. त्यातून घरात झुरळं (Cockroaches), माश्या, कीडे, ढेकूण, वाळवी अशांचा समस्याही आपल्याला अनेकदा भेडसावत असतात. त्यामुळे आपलं घरही अस्वच्छ राहते त्यातून सर्वात कॉमन समस्या आहे ती म्हणजे झुरळांची. झुरळं आपल्या घरात विशेष अशा ठिकाणी लपून बसलेले असतात आणि त्यांना शोधताना मात्र आपल्या नाकीनऊ येतात. (these are the simple remedies to get rid of cockroaches use this home made spray to control the problem of insects)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वयंपाकघरात (Cockroches in Kitchen) झुरळ फिरत असल्याचे पाहून तर आपल्या घशाखाली जेवणही जात नाही. आपल्यापैंकी बऱ्याच जणांना ही समस्या सतावत असते. पण त्यावर कधी काय उपाय करावा हेच आपल्या लक्षात येत नाही. परंतु झुरळं आणि अन्य कीटकांना मारण्यासाठी तुम्ही घरगुती स्प्रे (Home Made Spray) तयार करू शकता ज्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. 


घरातील झुरळ आणि माशी-डास नष्ट करण्यासाठी स्प्रे तयार करा. हा स्प्रे तयार करण्यासाठी एका भांड्यात पाणी भरा. यानंतर त्यात लसणाची सालं, मिरचीचे देठ आणि कोरफडीची काडी टाकून झाकून ठेवा. ते पाणी तीन दिवस असेच झाकून ठेवा. यानंतर पाण्यात असलेल्या सर्व गोष्टी बारीक करा आणि गाळून घ्या आणि त्याच पाण्यात मिसळा. तुमचा स्प्रे तयार होईल. 


स्प्रे बनवताना लक्षात ठेवा की त्याला दुर्गंधी येऊ शकते. त्यामुळे तो स्वयंपाकघरात किंवा झोपण्याच्या खोलीत ठेवू नका. त्याऐवजी तो एका भांड्यात ठेवून ते भांडे अशा ठिकाणी ठेवा जेथे घरातील लोकांचा वावर कमी असेल. भांडं 3 दिवस घट्ट बंद ठेवा. त्यानंतरच ते उघडा.


हा स्प्रे बनवल्यानंतर झुरळ आणि डास-माशी लपण्याच्या ठिकाणी 2-3 वेळा तो मारा. ज्या ठिकाणी ओलसरपणा आहे किंवा पाणी शिल्लक आहे अशा ठिकाणी तो मारावा. पलंगाखाली आणि पेटीच्या मागे जास्त करून तो मारा. त्यामुळे डास व माशांची पैदास होत नाही. 


(Disclaimer : वर दिलेली माहिती ही सामान्य ज्ञान आणि घरगुती उपायांवर आधारित आहे. ZEE 24 Taas याची खात्री करत नाही.)