कांदा कापताना डोळ्यातून पाणी येतं? फोलो करा `या` टीप्स
आपण नेहमीच असा विचार करतो की कांद्यापासून आपल्याला सुटका कशी मिळेल.
Tips while online cutting : कांदे कापताना आपल्याला डोळ्यात पाणी येयला लागते आणि कधीकधी डोळ्यात येणारं हे पाणी इतकं सहय्य होतं की डोळे झोंबतात. अनेकदा कांदे कापताना आपल्याला हातांनाही कांद्याचा उर्ग वास येतो. त्यामुळे कांदा कापणं हे आपल्यासाठी फारच डोकेदुखीचं काम आहे. त्यातून काहींना कांद्याशिवाय जेवणही करताना येत नाही. आपल्या प्रत्येकाच्या जेवणात कांद्याचा वापर हा असतोच असतो. त्यामुळे कांदा चिरण्याशिवायही आपल्याकडे पर्याय नसतो. (these are the simple tips while cutting onion and avoid tears coming from eyes)
आपण नेहमीच असा विचार करतो की कांद्यापासून (Onion) आपल्याला सुटका कशी मिळेल. कांदा कापताना डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणून आपण काय करू शकतो असा प्रश्न पडतो. काळजी करू नका कांद्यापासून संरक्षण करण्यासाठी हे उपाय केलेत तर कांद्यामुळे डोळ्याला होणाऱ्या त्रासापासून तुम्ही वाचू शकता.
आणखी वाचा - 'हर हर महादेव' चित्रपटातील भुमिकेबद्दल अभिनेता सुबोध भावेचा मोठा निर्णय
कांदा कापताना रासायनिक अभिक्रिया म्हणजेच केमिकल रिएक्शन होते आणि ही रिएक्शन होऊन एक विशिष्ट गॅस (Gas) बाहेर पडतो. हा गॅस म्हणजे वायू पाण्याच्या संपर्कात आल्यावर त्याचे एसिडमध्ये रुपांतर होते ज्यामुळे डोळ्यांना जळजळ होते आणि याच प्रक्रियेमुळे आपल्या डोळ्यात पाणी येयला लागते. आम्ही तुम्हाला काही अतिशय सोप्या टीप्स सांगत आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही सहजपणे कांदा कापू शकाल आणि तुमच्या डोळ्यात पाणी येणार नाही.
कांद्याची साल काढून अर्धा तास पाण्यात बुडवून ठेवा. तो पाण्यात ठेवल्याने कांदा चिकट होईल.
कांदा सोलून घ्या आणि काही वेळ व्हिनेगर आणि पाण्याच्या द्रावणात बुडवून ठेवा. त्यानंतर कांदा कापल्यानंतर डोळ्यात अश्रू येणार नाहीत.
कांदा सोलून फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर कांदा कापल्याने डोळ्यात पाणी येणार नाही. बहुतेक लोक ही पद्धत वापरणे टाळतात कारण ते कांद्याच्या वासाने फ्रीजमध्येही तो वास शिरतो.
एका भांड्यात गरम पाणी घ्या आणि कांदा कापताना ते भांडं तुमच्या कांद्याजवळ ठेवा. गरम पाणी हे कांद्यातून निघणारा दर्प नष्ट करते. कांदा पाण्यात बुडवून घेतल्यासही फरक जाणवतो.
कांदा चिरताना त्याचा एक जाडसर रूमाल डोक्यावर ठेवावा.
कांदा कापण्यापूर्वी तो वाहत्या पाण्याखाली धरुन ठेवा म्हणजे कापताना डोळे चुरुचुरणार नाही आणि पाणी सुद्धा येणार नाहीत.
कांद्यामध्ये अनेक गंधसंयुक्ते संयुगे आणि एन्झाइम असतात. जोपर्यंत आपण कांदा चिरत नाही तोपर्यंत या एन्झाईम्सचा हवेशी संपर्क येत नाही. एकदा का हे घटक हवेच्या संपर्कात आले की ते पसरू लागतात आणि त्याच्या उग्र दर्पाने डोळ्यातून पाणी येते. जेव्हा आपण कांदा धुवून किंवा थंड करून चिरतो तेव्हा पाण्याच्या अंशाने हे एंझाइम निघून गेलेले असतात त्यामुळे त्रास कमी होतो.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)