High cholesterol: सततची धावपळ आणि अयोग्य आहार यामुळे आजकाल तरूणांच्या मागे अनेक आजार लागल्याचं दिसून येतं. यामध्ये या चुकीच्या सवयींमुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाणंही वाढल्याचं पाहायला मिळतं. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं की त्याचा परिणाम तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर होतो. कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने लोकांमध्ये लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबाचा धोकाही वाढण्याचा धोका असतो. चरबीचा जाड थर तुमच्या धमन्यांमधील रक्तप्रवाहात अडथळा आणू शकतो, ज्यामुळे ऑक्सिजन सर्व अवयवांपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं की काही खास बदल दिसून येतात. जाणून घेऊया कोलेस्ट्रॉल वाढण्याची कोणती लक्षणं आपल्या शरीरात दिसून येतात. 


नखांचा रंग पिवळा होणं


ज्यावेळी तुमच्या शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढते तेव्हा तुमच्या नखांचा रंग पिवळा होतो. याचा अर्थ तुमच्या धमन्यांमध्ये प्लाक जमा होण्यास सुरुवात होते, तेव्हा तुमच्या धमन्या अरुंद होतात आणि रक्त नीट वाहत नाही. हे केवळ तुमच्या नखांमध्येच नाही तर शरीरातील इतर भागांमध्येही दिसून येतं. यावेळी तुमच्या नखांची वाढही थांबण्याची शक्यता असते.


हातात मुंग्या येणं


शरीराच्या काही भागात रक्तप्रवाहात अडथळा निर्माण झाल्यामुळे हाताला मुंग्या येण्याची समस्या जाणवू शकते. उच्च कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणामुळे रक्त नीट वाहत नाही. यामुळे हातांना मुंग्या येऊ शकतात.


हात आणि कोपरामध्येही दिसतात लक्षणं


उच्च कोलेस्टेरॉलची पातळी वेळेत नियंत्रित केली नाही रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. परिणामी हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका असतो. या स्थितीत शरीराच्या अनेक भागांमध्ये पिवळेपणा दिसू लागतो. शरीरावर पिवळे डाग पडणं किंवा नखं ​​पिवळी पडणे हे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे असू शकते. 


हातांमध्ये वेदना जाणवणं


ज्यावेळी तुमच्या शरीरात प्लाक जमा होतो त्यावेळी ते रक्तवाहिन्या बंद करतात, या स्थितीला एथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. शरीरात कोलेस्ट्रॉल तयार होत असल्याने हातातील रक्तवाहिन्या बंद होऊ शकतात. याचा परिणाम हाताच्या रक्तवाहिन्यांवर होत असून हातामध्ये वेदना जाणवू शकतात.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)