किचनमधील हे पदार्थ कमी करतील तुमचं Belly Fat!
बेली फॅट कमी करण्यासाठी या गोष्टींचं सेवन करा
मुंबई : लठ्ठपणा ही आजकाल अनेकांची समस्या बनली आहे. सध्या तरूणांपासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत फिटनेस हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हालाही तुमचं वजन कमी करायचं आहे का? तर तुम्ही स्वयंपाकघरात जा. आता तुम्हाला प्रश्न पडेल की स्वयंपाकघरात का?
तर स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी सापडतील ज्या तुम्हाला पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतात. चला तर मग जाणून घेऊया अशाच गोष्टी ज्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध आहेत. यापदार्थांमुळे तुमची चयापचय क्रिया सुधारते.
बेली फॅट कमी करण्यासाठी या गोष्टींचं सेवन करा
आलं
आयुर्वेदातील हा घटक चयापचय क्रिया 20 टक्क्यांपर्यंत वाढवतो. यामधील घटक चरबी कमी करतात आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. याच्या नियमित वापराने तुमचे वजन तर कमी होतंच, पण त्यामुळे तुमचं आरोग्यही चांगलं राहतं.
दालचिनी
दालचिनीचा उपयोग आयुर्वेदात जंतुनाशक, बॅक्टेरियाविरोधी गुणधर्मांसाठी केला जातो. वजन कमी करण्यासाठी यातील घटक चयापचय क्रियेचा दर वाढवतो. हा घटक रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतो. सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी दालचिनी मिसळलेले पाणी प्यायल्याने भूक कमी होते आणि कोलेस्ट्रॉलही कमी होतं.
लिंबू
लिंबाच्या सेवनाने वजन लवकर कमी होतं. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर असतं ज्याचे अनेक फायदे आहेत. हृदयाशी संबंधित आजार, अशक्तपणा, किडनी स्टोन, सुरळीत पचन यासाठी लिंबू फायदेशीर आहे.