EGG: अशा लोकांनी चुकूनही अंडी खाऊ नये, अन्यथा रुग्णालयातील खाटेवर पडलाच समजा
अंड खाल्यास कोणत्या समस्या होऊ शकतात... आणि कोणी Egg खाऊ नये..., जाणून घ्या तुम्ही अंड खाल्यास तुम्हाला होणार नाही ना कोणता त्रास...
Disadvantages Of Eating Eggs: आपल्याला फीट रहायचं आहे तर अंडी (Eggs) खाणं गरजेचे आहे असे म्हणतात. आपल्या शरीरातील प्रोटीन आणि कॅल्शियम कमी झाल्यास डॉक्टर देखील आपल्याला सल्ला देतात की अंडी खा. पण अंडी खाल्यानं फक्त प्रोटीन नाही तर मिनरल्स देखील मिळतात. त्यामुळेच हाडे मजबूत होतात आणि बुद्धीदेखील तल्लख होते. पण प्रोटीन आणि कॅल्शियमचा स्त्रोत असणारी अंडी रोज खाल्यानं अनेक समस्या देखील होऊ शकतात. तर त्यात काही लोक आहेत ज्या लोकांनी अंड्याचे सेवन करणे टाळायला हवे. कारण यामुळे तुमचं आरोग्य चांगल होणार नाही तर काही गंभीर समस्या होऊ शकतात. चला तर जाणून घेऊया की कोणत्या लोकांनी चुकूनही अंडी खाऊ नयेत?
कोणत्या लोकांनी करू नये अंड्यांचे सेवन
अपचन (indigestion)
तुमची पचनशक्ती कमकुवत असेल, तर तुम्ही थोडं देखील खाल्यास छातीत जळजळ होते आणि अॅसिडीटी आणि गॅसची तक्रार तुम्ही करत असाल. तर अशा लोकांनी चुकूनही अंड्याचे सेवन करू नका, कारण अंड्याचे सेवन केल्याने हा त्रास अधिक बळावू शकतो. त्यामुळे अंड्याचे सेवन टाळा.
हृदयरोगी (heart patient)
जर तुम्ही हृदय विकाराचे रुग्ण असाल तर चुकूनही अंड्याचे सेवन करू नका. कारण अंड्यांमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे नसांचा रक्तपुरवठा थांबू शकतो. असे झाल्यास रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताभिसरणात समस्या निर्माण होऊन हृदयविकाराची शक्यता वाढू शकतो.
जुलाब (Diarrhea)
तुम्हाला जुलाब होत असतील किंवा रोजच्या जीवनात तुम्हाला सतत टॉयलेटला जावे लागत असेल तर तुम्ही चुकूनही अंड्याचे सेवन करू नये. कारण अंडी खाल्ल्याने हा त्रास वाढू शकतो. म्हणूनच याचे सेवन टाळा.
कोलेस्ट्रॉल (cholesterol)
शरीरात खराब कोलेस्टेरॉल रक्ताच्या नसांमध्ये जमा होऊन ते नसांना ब्लॉक करते. जर तुम्ही हाय कोलेस्ट्रॉलच्या समस्येने त्रस्त असाल तर चुकूनही अंड्याचे सेवन करू नका. कारण अंड्याच्या पिवळ्या भागात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे तुम्ही ते खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू लागते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.