मुंबई : आल्याचे अनेक फायदे आपल्याला ठाऊक आहेत. चहापासून ते अगदी भाजीतही आलं घातले जाते. आयर्न, कॅल्शियम, आयोडीन, क्लोरीन आणि व्हिटॉमिनने परिपूर्ण असलेल्या आल्यात अनेक पोषकघटक असतात. आलं हे उष्ण असल्याने थंडीच्या दिवसात याचा वापर अधिक केला जातो. आल्याचे अनेक गुणधर्म आणि फायदे आपल्याला ठाऊक आहेत. परंतु, काही लोकांसाठी आलं खाणं त्रासदायक ठरते. पहा कोणत्या लोकांनी आले खाणे टाळावे....


वजन वाढवणाऱ्यांनी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यांना वजन वाढवायचे आहे, त्यांनी आल्याचे सेवन करणे टाळावे. कारण आल्यामुळे भूक कमी लागते. त्यामुळे वजन वाढवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या लोकांवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो.


हिमोफिलिया असल्यास


हिमोफिलिया ग्रस्त लोकांना आल्याचे सेवन त्रासदायक ठरते. कारण आल्याच्या सेवनाने रक्त पातळ होऊ लागते. जे त्यांच्या आरोग्यासाठी योग्य नसते. म्हणून अशा लोकांनी आलं खाणे टाळावे.


प्रेग्नेंसीच्या या टप्प्यावर


प्रेग्नेंसीच्या सुरुवातीच्या काळात आल्याचे सेवन करणे योग्य ठरेल. कारण सुरुवातीला येणारा मार्निंग सिकनेस आणि कमकुवतपणा दूर करण्यास आलं मदत करेल. पण शेवटच्या तीन महिन्यात प्रेग्नेंट महिलांनी आलं खाणे टाळावे. कारण याच्या सेवनाने प्रीमॅच्युअर डिलिव्हरी आणि लेबर पेन्सचा धोका वाढतो.


नियमित औषधं घेणाऱ्यांनी


जे लोक नियमित औषधे घेतात. त्यांनी आल्याचे सेवन करणे टाळावे. कारण औषधांमध्ये बेटा ब्लॉकर्स, अॅंटीकोगुलॅंट्स आणि इन्सुलिन असते. आल्यासोबत मिसळल्याने त्याचे विषारी मिश्रण बनते, जे शरीराला हानी पोहचवेल.