शरीरातील स्टॅमिना वाढवण्यासाठी करा हे सोपे उपाय
या 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या
मुंबई : फिटनेस आणि उत्तम दिसण्यासाठी अनेकदा लोकं जिम ज्वाइन करतात. मात्र थोड्याशा एक्सर्साइजनेच दम निघून जातो. जर तुमच्यासोबत देखील असं होत असेल तर याचा अर्थ तुमचा स्टॅमिना कमी आहे. कमी स्टॅमिना असल्यामुळे तुम्ही जीमचा पूर्ण आनंद घेऊ शकत नाही. पण स्टॅमिना कमी असल्यामुळे घाबरण्याच काही कारण नाही. कारण काही सोप्या गोष्टीमुळे तुम्ही स्टॅमिना सहज वाढवू शकता.
यामुळे स्टॅमिना कमी होतो
शरीरातील स्टॅमिना कमी होण्याची अनेक कारण आहेत. अनेकदा पाणी कमी असल्यामुळे स्टॅमिना कमी होतो. शरीरातील 70 टक्के भाग हा पाण्याने भरलेला असतो. शरीराला सतत पाण्याची आवश्यकता लागते. जर तु्मच्या शरीरात कमी पाणी असेल आणि तुम्ही खूप प्रॅक्टिस केली तरीही स्टॅमिना मेनटेन राहणार नाही. यामुळे दिवसाला 4 ते 5 लिटर पाणी प्यावे.
रनिंगच्या अगोदर पाणी आवश्यक
जर तुम्ही रोज सकाळी धावायला जात असाल तर शरीरासाठी पाणी आवश्यक आहे. रनिंगच्या अगोदर कमीत कमी दोन ते तीन ग्लास पाणी प्या. तसेच धावायला जाताना पाण्याची बॉटलसोबत ठेवा. अधिक मेहनतीचे काम केल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. आणि डिहायड्रेशनचा त्रास वाढतो.
शरीरात कार्बोहायड्रेटची कमतरता
कार्बोहायड्रेट तुमच्या शरीराला एनर्जी देतात. सामान्यपणे आहार कार्बोहायड्रेड असेल तर त्यातून मिळणारी ऊर्जी ही दिवसभर पुरते. मात्र जर तुम्ही जिममध्ये जात असाल किंवा अतिरिक्त मेहनत करत असाल तर शरीरात कार्बोहायड्रेडची कमतरता जाणवते. वर्कआऊटच्या 40 मिनिटे अगोदर कार्बोहायड्रेडचे रिच डाएट नक्की घ्या.