मुंबई : हाडांच्या चांगल्या आरोग्यासाठी कॅल्शियमची फार गरज असते. ह्रदयाचे ठोके नियमित ठेवण्यासाठी कॅल्शियम उपयोगी ठरते. वाढत्या वयामध्ये महिलांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी होत असते. नियमित आहारातून आपण कॅल्शियमचे प्रमाण नियंत्रित ठेऊ शकतो. शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी झाले की अनेक आजार होण्याची शक्यता असते. कॅल्शियमचे शरीरातील प्रमाण कमी झाले तर डॉक्टर कॅल्शियमच्या औषधांचा अथवा गोळ्यांचा समावेश करण्यास सांगतात. त्यामुळे कॅल्शियमची कमतरता वेळीच लक्षात येणे गरजेचे आहे.


कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणं


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    हाडे ठिसूळ होणे

  • दात तुटणे

  • अशक्तपणा येणे

  • लहान मुलांना उशीरा दात येणे


 
कॅल्शियमच्या कमतरतेची कारणं


  • दैनंदिन आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांची कमी

  • ऊन तसेच शरीरिक कामाचा अभाव

  • अतिरिक्त गोड पदार्थांचे सेवन

  • स्त्रियांना मासिक पाळीत अधिक स्त्राव होणं    


 


कॅल्शियमयुक्त आहार


संत्र


संत्र्यामध्ये अधिक प्रमाणात कॅल्शियम असते. या फळाच्या सेवनाने शरीरात कॅल्शियमचं प्रमाण चांगलं राहण्यास मदत होते.


सोया


सोया मिल्क, सोयाबिन तसेच टोफू यांमधून शरीराला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळू शकते. त्यासोबत यामधून लोह, मॅग्नेशियम तसेच प्रथिनंही मिळतात.


अंजीर


अंजीर या फळामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. याशिवाय कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम इत्यादी घटकदेखील समाविष्ट असतात. दोन अंजीर खाल्याने तुम्हाला ५५ ग्रॅम कॅल्शियम मिळू शकते.


 


ब्रोकोली


ताजी ब्रोकोली खाल्यास 47 ग्रॅम कॅल्शियम मिळते. त्याशिवाय ब्रोकोलीच्या सेवनाने यकृताच्या कर्करोगाचा धोका टळतो.