Vegetables For Diabetes: मधुमेहाची समस्या जगभरात अगदी सामान्य बनताना दिसतेय. मधुमेहाच्या रूग्णांना त्यांच्या आहाराची प्रचंड काळजी घ्यावी लागते. मधुमेहाचा विचार करता शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे खूप महत्त्वाचे असते. मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या खाण्यापिण्याकडे अधिक लक्ष देणं आवश्यक आहे. त्यांनी काही अयोग्य खाल्लं तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या रक्तातील साखरेच्या वाढत्या पातळीवर दिसून येतो. त्यामुळे मधुमेही रूग्णांनी आपल्या आहारावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मधुमेहाच्या समस्येने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना उच्च आणि कमी रक्तातील साखरेची पातळी या समस्येचा सामना करावा लागतो. अशावेळी मधुमेही रूग्णांच्या मनात प्रश्न असतो की, आहारात कोणत्या भाज्यांचा समावेश करावा. काही भाज्यांच्या सेवनामुळे रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते. अशावेळी मधुमेही रूग्णांनी कोणत्या भाजांचा समावेश करावा ते पाहुयात.


कारलं


कारलं खाण्याचे अनेक फायदे आहेत. कारल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते असं मानलं जातं. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते खूप फायदेशीर मानलं जातं. त्यामुळे या रुग्णांनी आपल्या आहारात कारल्याचा समावेश जरूर करावा.


भेंडी


भेंडीच्या भाजीचं सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतं. भेंडीमध्ये कॅलरीज कमी असतात तसंच फॅटही कमी असतं. रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी भेंडीचं सेवन फायदेशीर ठरतं. तसंच भेंडी हे वजन कमी करण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर असल्याचं सिद्ध झालं आहे.


गाजर


मधुमेहाच्या रुग्णांसाठी गाजराचे सेवन फायदेशीर मानले जाते. गाजरात भरपूर फायबर असतं. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी गाजराचं सेवन करावं.


ब्रोकोली


ब्रोकोलीच्या सेवनाने शरीरातील रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. ब्रोकोलीमध्ये सल्फोराफेन मुबलक प्रमाणात आढळतं. शरीरातील यकृताच्या पेशींमध्ये असलेलं ग्लुकोज आणि ग्लायकेटेड हिमोग्लोबीन कमी ठेवण्यासाठी हे फायदेशीर सिद्ध होतं.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)