Office Weight Gain: ऑफिसमधील `या` चुकीच्या सवयी वाढवतील तुमचं वजन
आपण अनेकदा ऑफिसमध्ये खूप व्यस्त असतो. अशा वेळी अनेक वेळा आपण काही सवयींकडे दुर्लक्ष करतो
मुंबई : ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये वजन वाढणं ही एक सामान्य समस्या बनलीये. तासन तास बसून राहिल्याने कॅलरीज बर्न न झाल्याने लठ्ठपणा वाढू लागतो. अशा स्थितीत वजन कमी करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. पण वजन कमी होण्याऐवजी ते वाढू लागतं.
आपण अनेकदा ऑफिसमध्ये खूप व्यस्त असतो. अशा वेळी अनेक वेळा आपण काही सवयींकडे दुर्लक्ष करतो, ज्यामुळे लठ्ठपणाची समस्या वाढू लागते. तर आज आम्ही तुम्हाला ऑफिसशी संबंधित अशा सर्व वाईट सवयींबद्दल सांगतो ज्या वजन वाढण्यास कारणीभूत आहेत.
लेट नाईट शिफ्ट
लेट नाईट शिफ्टमुळे बरेच लोक रात्री उशिरा झोपतात. अशावेळी लोकं भूक लागल्यावर गरजेपेक्षा जास्त कॅलरीयुक्त पदार्थ खातात. त्यामुळे लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते. उशिरा रात्रीच्या शिफ्टमध्ये, लोकांना वेळेवर जेवण करणं शक्य होत नाही. त्यांच्या जेवणाच्या वेळा दिवसेंदिवस बदलतात.
अनहेल्दी खाणं
कामामध्ये व्यस्त असल्याने अनेकदा लोकं कुकीज किंवा इतर काहीही अनहेल्दी खातात. ज्यामुळे तुमच्या शरीरात कॅलरीज वाढतात आणि लठ्ठपणाची समस्या वाढू लागते.
वेळेवर न खाणं
ऑफिसच्या कामात व्यस्त असल्यामुळे जर तुमची रोजची जेवणाची वेळ बदलत असेल तर तसं करणं टाळा. वजन वाढण्यासोबतच ते तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक आजार जडू शकण्याची समस्या असते.