मुंबई : अनेकदा काही लोक पहिल्या भेटीतच समोरच्या बद्दल सर्व काही जाणून घेऊ इच्छीतात. या गोष्टीकडे तुम्ही बरेचदा दुर्लक्ष करता तर कधीतरी यावरुन हैराणही होता. पण तुम्हाला माहित आहे का? असे केव्हा होते किंवा समोरची व्यक्ती असे का वागते? समोरची व्यक्ती जेव्हा एका नजरेत तुमच्यावर फिदा होते, तेव्हा ती अशी वागते. समोरची व्यक्ती तुमच्यावर पूर्णपणे फिदा आहे हे या इशारांवरुन ओळखा...


वैयक्तिक आयुष्याविषयी विचारणे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्याच भेटीत जर कोणी तुम्हाला तुमच्या खाजगी आयुष्याबद्दल विचारत असेल तर ती व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होत आहे, असे समजा. म्हणूनच तुम्ही कोणत्या रिलेशनशीपमध्ये तर नाही ना? हे जाणून घेण्यासाठी असे प्रश्न विचारले जातात.


स्पर्श करण्याचा प्रयत्न


फिदा असणारी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने स्पर्श करण्याचा प्रयत्न करते. तुम्हालाही असा अनुभव आला असेल किंवा येत असेल तर हा आकर्षणाचा इशारा आहे.


हसणे


तुम्ही भेटल्यानंतर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसेल. तुम्हाला पाहताच तिच्या/त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटेल.


स्तुती


मुलींची स्तुती करण्याची सवय अनेक मुलांना असते. पण पहिल्याच भेटीत जर कोणी तुमची स्तुती करत असेल, तर समजून जा ती व्यक्ती तुमच्यावर फिदा आहे. मग तुमची स्तुती करण्याची एकही संधी तो/ती सोडणार नाही.


कम्फर्टीबिलीटी काळजी घेणे


कोणताही व्यक्ती जेव्हा पहिल्याच भेटीत आवडते तेव्हा तिच्या कम्फर्टीबिलीटीची काळजी आपसुकच घेतली जाते. कंपर्टेबल होण्यासाठी प्रयत्न केले जातात. तुम्हाला आला असेल असा अनुभव तर मग समजून जा.